Nanded :- सामाजिक समतेची प्रतिष्ठापणा, बहुजन समाजाच्या (Bahujan Samaj) उद्धारासाठी कार्य करणाऱ्या राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांचे २६ जून रोजी १५० वर्ष पुर्ण झाले आहेत.
राजेर्षी शाहू महाराजांच्या जयंती महोत्सवाचे नांदेडमध्ये आयोजन
या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर शासनाने राजेर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करायला पाहीजे होती. पण ते केले नसल्यामुळे शासनाचा मी निषेध करतो. आणि ऑगस्ट मध्ये राजेर्षी शाहू महाराजांच्या जयंती महोत्सवाचे नांदेडमध्ये आयोजन करत आहोत. या महोत्सवाला श्रीमंत शाहू महाराज, नानाभाऊ पटोले, चंद्रकांत हंडोरे यांना निमंत्रित करणार असल्याची माहिती राजेश पावडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत (press conference) दिली आहे. या जयंती महोत्सवात व्याख्यान, निबंध स्पर्धा, समता रॅली, पुरस्कार यासह इतर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे देखील राजेश पावडे यांनी सांगितले.