नवी दिल्ली (Rajendra Nagar incident) : दिल्लीच्या जुन्या राजेंद्र नगरमध्ये UPSC परीक्षार्थींच्या मृत्यूनंतर, आता प्रसिद्ध UPSC शिक्षक डॉ. विकास दिव्यकीर्ती (Vikas Divyakirti) यांच्या कोचिंग संस्थेच्या (Drishti IAS) दृष्टी IAS ने एक मोठी घोषणा केली आहे. दृष्टी IAS ने Rouse IAS स्टडी सर्कल कोचिंग सेंटरच्या (Rajendra Nagar incident) तळघरात मरण पावलेल्या 3 विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. (Vikas Divyakirti) विकास दिव्यकीर्तीच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
राजेंद्र नगरमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या 4 विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये
दिल्लीमध्ये 27 जुलै रोजी जुने राजेंद्र नगर येथे मुसळधार पावसात राऊस आयएएस स्टडी सर्कल कोचिंग सेंटरच्या तळघरातील लायब्ररीत पूर आल्याने 3 यूपीएससी परीक्षार्थींचा मृत्यू झाला होता. आता (Drishti IAS) दृष्टी आयएएसने म्हटले आहे की, मृत श्रेया यादव (उत्तर प्रदेश), निविन डालविन (केरळ) आणि तान्या सोनी (तेलंगणा) यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल. याशिवाय विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबालाही 10 लाखांची मदत दिली जाणार आहे.
विकास दिव्यकीर्ती यांचे निवेदन जारी
दृष्टी आयएएसचे (Drishti IAS) संस्थापक विकास दिव्यकीर्ती (Vikas Divyakirti) यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत जुन्या राजेंद्र नगरमध्ये झालेल्या दोन अपघातांमध्ये चार हुशार विद्यार्थ्यांचा अकाली मृत्यू झाला. नीलेश राय या एका विद्यार्थ्याचा, पाणी साचलेल्या रस्त्यावर विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तर श्रेया यादव, तान्या सोनी आणि निविन डल्विन हे तीन विद्यार्थी कोचिंग सेंटरच्या तळघरात अचानक पाणी साचल्याने बळी पडले. (Rajendra Nagar incident) चार मुलांच्या कुटुंबांसाठी हा नक्कीच खूप कठीण काळ आहे. या दु:खाच्या क्षणी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत.
दृष्टी राऊस कोचिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांना IAS अभ्यासात मदत
दृष्टी आयएएसने (Drishti IAS) शोकग्रस्त कुटुंबांसोबत आपली एकता व्यक्त केली आहे. कोणत्याही पैशाने मुले गमावण्याचे दुःख पुसून टाकता येत नाही. तरीही या दुःखाच्या वेळी आमची एकजूट दाखवण्यासाठी आम्ही एक प्रयत्न दृष्टी आयएएसने करण्याचा निर्णय घेतला आहे. चार शोकग्रस्त कुटुंबांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. दृष्टी IAS ने असेही घोषित केले की, ते Rouse IAS स्टडी सर्कल कोचिंग सेंटरच्या विद्यमान (Rajendra Nagar incident) विद्यार्थ्यांना सामान्य अध्ययन, चाचणी मालिका आणि पर्यायी विषयांचे विनामूल्य वर्ग प्रदान करतील. ज्या विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे, ते सोमवार, 5 ऑगस्ट 2024 पासून आमच्या करोलबाग कार्यालयातील हेल्प डेस्कशी संपर्क साधू शकतात.
प्रेस विज्ञप्ति
2 अगस्त, 2024
पिछले कुछ दिनों में ओल्ड राजेंद्र नगर में हुई दो दुर्घटनाओं में चार होनहार विद्यार्थियों का असमय निधन हुआ। एक विद्यार्थी नीलेश राय का निधन जलमग्न सड़क पर करेंट लगने से हुआ जबकि तीन विद्यार्थी श्रेया यादव, तान्या सोनी और निविन डाल्विन एक कोचिंग… pic.twitter.com/xKDsV3lAWO
— Drishti IAS (@drishtiias) August 2, 2024