जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचे प्रतिपादन
अमरावती (Rajiv Gandhi) : राजीव गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यानंतर झालेल्या १९८४ च्या लोकसभा निवडणुकांत ५४२ पैकी ४११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. राजीव गांधीच्या (Rajiv Gandhi) आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळाला. संगणकयुगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरुवात ही त्यांच्या धोरणांतून झाली. असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख (Bablu Deshmukh) यांनी यावेळी केले.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राजीव गांधी यांना अभिवादन
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे अभिवादन करण्याकरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार बळवंत वानखडे यांची उपस्थिती होती, यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेला हारपण करून पूजन करण्यात आले. यावेळी हरिभाऊ मोहोड, प्रदीप देशमुख, रामेश्वर अभ्यंकर, जयंत देशमुख, प्रकाश काळबांडे, प्रवीण मनोहर, सुधाकर तलवारे, चंद्रशेखर खंडारे, समाधान दहातोंडे, सुनील जुनघरे, मुक्कदर खाँ पठाण, सिद्धार्थ बोबडे, विजय भुतडा, बिट्टू मंगरोळे, नंदू यादव,विनायक ठाकरे आदींची उपस्थिती होती.
राजीव गांधीनी (Rajiv Gandhi) तंत्रज्ञानसंबंधी क्षेत्रात आयातीवर सूट दिली. खासकरून संगणक, दूरसंचार क्षेत्र यात त्यांनी खास प्रयत्न केले. लायसन्स राज संपवण्याचा प्रयत्न करत त्यांनी आयातीचे नियम शिथिल केले. यावरून त्यांच्या कार्याची शैली आणि आपल्या देशाप्रती असलेले प्रेम दिसून येते.
– खासदार बळवंत वानखडे