कोठारी जवळील देवई फाट्याजवळ अपघात दोघेही राजुरातील रहिवासी
राजुरा (Rajura accident) : कोठारी गोंडपीपरी महामार्गातील देवई फाट्याजवळ भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या (Rajura accident) अपघातात दुचाकीवरील एक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दिनांक १४ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली असून ट्रक चालकास पोलिसांनी अटक केली आहे. कोठारी पासून ३ किलोमीटर अंतरावरील देवई फाट्यासमोरील वळणावर अपघात झाल्याची कोठारी पोलीस ठाण्यात माहिती मिळाली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचून तपासणी केली.
दुचाकी क्रमांक एम.एच. ३४ बी.टी. ९४१८ वरील एकाचा ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला तर दुसरा इसम गंभीर जखमी झाला असल्याचे आढळून आले. (Rajura accident) जखमी इसमाचा मोबाईल क्रमांकावरून पोलिसांनी फोन करून माहिती घेतली असता नाना जयराम कुबडे हे मृतक इसमाचे नाव असून रामप्रसाद मधुकर भुजगवार हे जखमीचे नाव आहे हे दोघेही इंदिरानगर वार्ड राजुरा येथील रहिवासी असल्याचे समजते.
जखमीस ग्रामीण रुग्णालय बल्हारशाह येथे नेण्यात आले आहे. दरम्यान अपघात करून पळून गेलेल्या ट्रकचा शोध कोठारी, गोंडपीपरी पोलीस करीत असताना गोंडपीपरी येथील सुरजागड लोह प्रकल्पाचा सुरक्षा रक्षकास (Rajura accident) अपघातग्रस्त ट्रक क्रमांक एम.एच.३३ टी. ४६५३ ग्रामीण रुग्णालय जवळ पकडण्यात आल्याची माहिती पोलीस हवालदार गणेश पोदाडी यांना सांगितले. लगेच ट्रक चालकास ट्रकसह ताब्यात घेऊन अपघातास कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोठारी पोलीस करीत आहेत.