नाशिक(Nashik):- निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपिठाचे पिठाधिश्वर अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी भक्त परिवारासह हजारो नागरिकांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर शहरातून लक्षवेधी रॅली(Rally) काढली. या रॅलीत टाळ मृदंगाचा गजर आणि आणि बॅनरच्या माध्यमातून राजकारणाच्या शुद्धीकरणाचा संदेश देण्यात आला. राजकारणात चांगल्या व्यक्तींनी यावे, देश सेवा करावी, नाशिकचा आवाज शांतीगिरीजी महाराज, लढा राष्ट्र हिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा, आता लढायच आणि जिंकायचं यांसह विविधांगी बोधात्मक विचार रॅलीत बॅनरच्या(banner) माध्यमातून देण्यात आले. स्थानिक नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी तसेच भाविकांनी बाबाजींचे ठिकठिकाणी स्वागत करत उत्फुर्त प्रतिसाद दिला.
त्र्यंबकेश्वर परिसरात लक्षवेधी प्रचार रॅली
नाशिक लोकसभेच्या निवडणूकीतील अपक्ष उमेदवार स्वामी शांतीगिरिजी महाराज यांच्या समर्थकांच्या वतीने त्र्यंबकेश्वर परिसरात लक्षवेधी प्रचार रॅली काढण्यात आली. नामस्मरण करत टाळ मृदंगाचा गजर आणि आणि बॅनरच्या माध्यमातून राजकारणाच्या शुद्धीकरणाचा संदेश देण्यात आला.राजकारणात चांगल्या व्यक्तींनी यावे,देश सेवा करावी. खूप केले पुढाऱ्यांसाठी आता फक्त बाबाजींसाठी..आता फक्त..देशासाठी..नाशिकचा आवाज शांतीगिरीजी महाराज…लढा राष्ट्र हिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा… बादली बदल घडवणार..आता नको आदला-बदली..आता हवी बादली आणि बादली..यांसह विविधांगी बोधात्मक विचार रॅलीत बॅनरच्या माध्यमातून देण्यात आले. एक विचाराने प्रेरित होऊन अंगात भगवा ड्रेस, हाती धर्मध्वज, शुद्धीकरणाचे बोधात्मक फलक, टाळ-मृदुंगाच्या गजरात जप करत हजारो भाविकांनी त्र्यंबेश्वरमध्ये लक्षवेधी ग्राम प्रदक्षणा केली. रॅली दरम्यान चौकातील छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati Shivaji Maharaj), डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे पूजन करत भगवान त्र्यंबकेश्वराला, तीर्थराज कुशावर्ताला व संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांना वंदन करत, नामजप, जयघोष करत रॅली संपन्न झाली.
महाराजांना विक्रमी मताधिक्य देऊ अशी ग्वाही नागरिकांनी यावेळी बोलून दाखवली
राजकारणाचे शुद्धीकरण आणि देशसेवेसाठी अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज नाशिक लोकसभा निवडणुकीच्या(Lok Sabha Elections) रिंगणात उतरले आहेत. जनता जनार्दनाने महाराजांना विक्रमी मतदान करून विजयी केल्यास नाशिक पुण्यभूमीचा कायापालट होऊन विकासगंगा अवतरीत होईल. या निष्काम सेवेच्या प्रमुख अजेंड्यावर ‘लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा’ या प्रमुख हेतूने स्वामी शांतीगिरिजी महाराज निवडणूक लढवत असल्याचे भक्त परिवाराच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) मधून स्वामी शांतीगिरिजी महाराजांना विक्रमी मताधिक्य देऊ अशी ग्वाही नागरिकांनी यावेळी बोलून दाखवली.