अयोध्या (Ram Mandir Pandit Death) : अयोध्येच्या राम मंदिरात (Ram Mandir) रामललाच्या अभिषेकवेळी मुख्य पुजारी असलेले पंडित लक्ष्मीकांत दीक्षित (Laxmikant Dixit) यांचे निधन झाले. पंडित लक्ष्मीकांत दीक्षित (86 वर्ष) यांचे आज शनिवार वाराणसी येथे निधन झाले. पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडली, त्यानंतर काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला.
पंडित लक्ष्मीकांत दीक्षित (Laxmikant Dixit) हे मुख्य पुजारी होते. ज्यांनी 22 जानेवारी रोजी (Ram Mandir) राम मंदिरात 121 वैदिक ब्राह्मणांचे नेतृत्व केले होते. पंडित लक्ष्मीकांत दीक्षित काशीत राहत होते. काशीचे अभ्यासक पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या निधनामुळे वाराणसीमध्ये शोककळा पसरली आहे. मंगळागुरी या त्यांच्या निवासस्थानातून त्यांची अंतिम यात्रा काढण्यात येणार आहे. (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
पीएम मोदींनी (PM Modi) ट्विट केले की, देशातील प्रख्यात विद्वान आणि सांगवेद विद्यालयाचे यजुर्वेद शिक्षक लक्ष्मीकांत दीक्षित (Laxmikant Dixit) यांच्या निधनाची दुःखद बातमी मिळाली. दीक्षितजी हे काशीच्या विद्वान परंपरेतील एक प्रसिद्ध व्यक्ती होते. काशी विश्वनाथ धाम आणि (Ram Mandir) राम मंदिराच्या उद्घाटन समारंभात मला त्यांच्या उपस्थितीत राहण्याची संधी मिळाली. त्यांच्या निधनाने समाजाची कधीही भरून न येणारी हानी आहे.
देश के मूर्धन्य विद्वान और साङ्गवेद विद्यालय के यजुर्वेदाध्यापक लक्ष्मीकान्त दीक्षित जी के निधन का दुःखद समाचार मिला। दीक्षित जी काशी की विद्वत् परंपरा के यशपुरुष थे। काशी विश्वनाथ धाम और राम मंदिर के लोकार्पण पर्व पर मुझे उनका सान्निध्य मिला। उनका निधन समाज के लिए अपूरणीय क्षति…
— Narendra Modi (@narendramodi) June 22, 2024
सीएम योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी पोस्टमध्ये लिहिले की, वेदमूर्ती, आचार्य श्री लक्ष्मीकांत दीक्षित (Laxmikant Dixit), काशीचे महान विद्वान आणि श्री रामजन्मभूमी प्राण प्रतिष्ठाचे मुख्य पुजारी यांचे निधन हे अध्यात्म आणि साहित्य जगताचे कधीही न भरून येणारे नुकसान आहे. संस्कृत भाषा आणि भारतीय संस्कृतीसाठी त्यांनी केलेल्या सेवेसाठी ते सदैव स्मरणात राहतील. दिवंगत संतांना आपल्या चरणी स्थान देवो आणि त्यांच्या शिष्यांना व अनुयायांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रभू श्री राम चरणी प्रार्थना.
VIDEO | Pandit Laxmikant Dixit, who led Ayodhya Ram Temple 'Pran Pratistha' ceremony, passed away in Varanasi earlier today
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/cUrFCsMThM
— Press Trust of India (@PTI_News) June 22, 2024