नथुराम बाबा केहाळकर यांची पुण्यतिथी तपपूर्ती सोहळ्यानिमित्त
परभणी/सेलू (Ramayanacharya Dhok Maharaj) : शहरातील नूतन विद्यालय परिसरातील हनुमान गढी या ठिकाणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा व गुरुवर्य श्री संत नथुराम बाबा केहाळकर यांची पुण्यतिथी तपपूर्ती सोहळ्यानिमित्त सेलु शहरासह परिसरातील भाविकासाठी नागपूर येथील रामकथा प्रवक्ते रामायणाचार्य ह. भ. प. श्री रामरावजी महाराज ढोक (Ramayanacharya Dhok Maharaj) यांच्या मधुर वाणीतून संगीत तुलसी रामकथा चे आयोजन सेलू तालुक्याचे भूमिपुत्र पिंपरी खुर्द येथील प्रसिद्ध उद्योजक आर. बी. घोडके यांनी केले आहे.
ही संगीत तुलसी रामकथा २५ मार्च ते ३०मार्च २०२५ दरम्यान दररोज सायंकाळी ६ ते ९ या दरम्यान होणार आहे. याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन आर. बी. घोडके यांचे बंधू भगवानराव घोडके सह इतरांनी केले आहे. रविवार ३०मार्च रोजी सकाळी ९ ते १२ या वेळात रामकथा होणारा असून वारकरी गौरव संतपूजन व कथा श्रवण तर दुपारी १ ते ४ महाप्रसादाचे (Ramayanacharya Dhok Maharaj) आयोजन करण्यात आले आहे.
संत पूजनामध्ये कृष्णा चैतन्य पुरी महाराज ,मनीषानंद पुरीजी महाराज ,अच्युत महाराज दस्तापुरकर ,बाळू महाराज गिरगावकर, रमेश महाराज जोगवाडकर ,ज्ञानोबा माऊली डाके महाराज ,नामदेव महाराज ढवळे चारठाणकर ,सारंगधर महाराज रोडगे रवळगावकर, मारोती महाराज वाघ ,जयराम महाराज तांगडे, कालिदास महाराज आवलगावकर यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमाला शहरासह परिसरातील भाविकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आर बी घोडके, भगवानराव घोडके, अशोक घोडके, अंबादास घोडके ,डॉ. रवींद्र घोडके, डॉ. राजेंद्र घोडके ,देवराव काळे, डॉ. केदार खटिंग, डॉ, कैलास आवटे, डॉ.शंकरराव काळे आदींनी केले आहे. यापूर्वी रामायणाचार्य ढोक महाराज (Ramayanacharya Dhok Maharaj) यांची संगीत तुलसी रामकथा ही सेलूत घोडके परिवारांच्या वतीने घेण्यात आली होती. ती औद्योगिक प्रशिक्षण परिसरात होती.तर यावर्षी रस्त्यावर असलेल्या नूतन विद्यालयाच्या परिसरात हनुमान गढी या ठिकाणी घेण्यात येत आहे. याची नोंद घ्यावी व जास्तीत जास्त भाविकांनी कथा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन घोडके परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.