केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांनी केली महायुतीकडे मागणी, म्हणाले राज्यात १२ जागांची अपेक्षा
देशोन्नती वृत्तसंकलन
चंद्रपूर (Ramdas Athawale) : येत्या काही दिवसांत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका घोषीत होणार असून महायुतीने आमच्या पक्षाला किमान १० ते १२ जागा सोडाव्यात अशी आमच्या पक्षाची अपेक्षा असून विदर्भातील चंद्रपूर विधानसभा ही अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने (Chandrapur Mahayuti) महायुती कडून चंद्रपूर विधानसभेच्या जागेवर रिपाई (आठवले गट) चा दावा असेल अशी माहिती रिपाई (आठवले गट) चे नेते व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिली.
गोंडवाना विद्यापीठाच्यावतीने आयोजित संविधान सन्मान जागृती कार्यक्रमासाठी ते आज चंद्रपुरात आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात किमान १० ते १२ जागा आणि विदर्भात तीन जागा सोडाव्यात अशी आग्रही मागणी असल्याचे ना. रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सांगीतले. देशात जाती गणना केल्यानंतर जातीयवाद वाढेल या मतांशी मी सहमत नसल्याचे स्पष्टपणे सांगीतले.
माझ्या या मताशी कॉग्रेस नेते खासदार राहुल गांधीही सहमत आहे असेही ते म्हणाले. (Ramdas Athawale) आठवले यांनी मराठा समाजाला स्वतंत्र कॅटेगिरीतून आरक्षण द्यावे, मनोज जरांगे ओबीसींच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी करित असले तरी ओबीसींमधून आरक्षण न देता यातून मार्ग काढून तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण द्यावे अशी सूचना केली.
कॉग्रेस नेते खासदार राहुल गांधी विदेशात भारताविरूध्द वक्तव्य करतात, तेव्हा त्यांचा पासपोर्ट जप्त करावा अशी मागणी केली आहे. मात्र हा आपला आग्रह नाही. राहुल गांधी माझे चांगले मित्र आहेत. लोकसभा निवडणुकीत कॉग्रेसला ९९ जागांवर यश मिळाले. इंडिया आघाडीने २३४ पेक्षा अधिक जागा जिंकल्या. राहुल गांधी चांगले काम करित आहे अशीही पुष्टी आठवले (Ramdas Athawale) यांनी जोडली.