जिल्हा अध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्या प्रयत्नास यश
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली (Ramdas Athawale) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अध्यक्ष नरहरी गवई व तालुका अध्यक्ष हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात २६ सप्टेंबर रोजी रिपाई आठवले गटाचा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी प्रथम ढोल ताशाच्या गजरात कार्यक्रमाला सुरुवात होवुन मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करूण हार अर्पण करण्यात आले.
यावेळी मंचकावर जिल्हाध्यक्ष नरहरी गवई , अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा अध्यक्ष प्रा.पठाण सर , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आशाताई वानखेडे , उपाध्यक्षा हेमा पवार , युवा नेते आम्रपाल वाघमारे, दत्ता पाटील राहणे, ता अ .निळकंठ सोनवणे , बाबुलाल इंगळे, संतोष वानखेडे ,शोभा सुरडकर, बाळासाहेब अहिरे ,केशवराव सरकटे, भागवत साळवे ,दीपक साळवे, विशाल गवळी, प्रकाश पाटील, खेडेकर महाराज सह जिल्हाभरातील सांप्रदायिक महिला मंडळ व भजनी मंडळ हजर होते.
कार्यक्रम प्रसंगी जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांनी सभेला मार्गदर्शन केले की , चिखली तालुकाध्यक्ष हिम्मतराव जाधव यांच्या कार्याची पावतीच दाखवून देत आहे की आजच्या सभेला सर्वच स्तरातून महिला पुरुषांनी व तरुणांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली आज गेल्या कित्येक वर्षांपासून एक पक्ष एकच नेता ही विश्वासार्हता टिकवून रिपाई पक्षाला जिल्ह्यातील मेहकर किंवा चिखली ची जागा विधानसभेसाठी सोडून घेऊ तसेच सामाजिक स्तरातील गोरगरीब कलावंत वृद्ध निराधार वेगवेगळे महामंडळ अण्णाभाऊ साठे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अपंग महामंडळ कलावंतांचे मानधन देण्यावर भर दिला त्याच बरोबर महिला आघाडी असो किंवा युवक आघाडी असो हे कार्यकर्ते जनतेपर्यंत पोहोचवून लाभ देण्याचा प्रयत्न राहील असे भावनिक उदगार नरहरी गवई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रचना जाधव अर्चना बोर्डे मीना खरे उषा इंगळे मयूर बोर्डे राहुल गवई माऊली ज्ञानेश्वर काकडे हेमा पवार सह असंख्य महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते आम्रपाल वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन हिम्मतराव जाधव यांनी केले .