रुग्णांना रुग्णवाहिकेच्या सहाय्याने केले रुग्णालयात दाखील
कोरची (Ramdas Masram) : तालुक्यातील नांदळी येथून दोन दुचाकीच्या साहाय्याने कुरखेडा मार्गावर जात असलेले 5 लोक कोरची पासून अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर दोन्ही दुचाकी घसरून पडली यावेळी विरुद्ध दिशेने सुसाट वेगाने येणाऱ्या सुरजागड कंपनी च्या ट्रकने या दोन्ही दुचाकिस्वारांना जबर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकी वर असलेल्या एका महिलेचा अक्षरशः शरीर पूर्ण चेंदामेंदा झाला होता तसेच एकाचा हाथ व जबडा व एकाचा पाय तुटलेल्या अवस्थेत दिसून आला.
आज काँग्रेस पक्षाचे उमेदवार रामदास मसराम (Ramdas Masram) यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी ते कोरची येथे आले असता त्यांना या (Korachi accident) घटनेची महीती प्राप्त होताच त्यांनी कार्यक्रम थांबवुन आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळ गाठले व लगेच रुग्णवाहिका बोलावून रुग्णांना स्वतः रुग्णालयात भरती केले. दुचाकीस्वार रोमन मडावी 21, दर्शना हलामी 24, मानिक नरेटी 25 , रमशीला काटेंगे 33 यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय कोरची येथून जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्यात आले
सुरजागड येथून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून यामुळे रस्त्याची सुद्धा दयनीय अवस्था झालेली आहे यावर आळा बसविण्यात यावा तसेच मृतक महिलेच्या कुटुंबियांना किमान 25 लाख व अपघातग्रस्त रुग्णांना किमान 5 लाख रुपये मदत तातडीने देण्यात यावी अशी मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम (Ramdas Masram) यांनी केली आहे. पुढील तपास बेडगाव पोलीस करीत आहे