हिंगोली विधानसभेची निवडणुक अपक्ष लढविणार
हिंगोली (Ramdas Patil Sumathankar) : भारतीय जनता पक्षाचे तरूण नेते रामदास पाटील सुमठाणकर यांनी शेवटी भाजपला राम राम ठोकला असुन ते हिंगोली विधानसभेतून अपक्ष निवडणुक लढविणार आहेत. प्रशासकीय सेवेत असलेल्या रामदास पाटील सुमठाणकर (Ramdas Patil Sumathankar) यांनी शासकीय नौकरीची शेवटची चार वर्षे हिंगोलीत घालविली. कोरोना काळात भारतीय जनता पक्षाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी गोर-गरीबांसाठी मोठे काम केले.
शिवाय त्यांनी हिंगोली नगर पालिकेतील (Hingoli Assembly Elections) आपल्या मुख्याधिकारी पदाच्या कार्यकाळात हिंगोली शहरातील रस्ते दुरूस्ती, पाणी पुरवठा योजना, जलेश्वर परिसराचे सुशोभिकरण व शहरातील अतिक्रमणे अशा अनेक आघाड्यांवर त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. या सर्व कामांच्या निमित्ताने हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या पासुन ते थेट देवेंद्र फडणवीस पर्यंत अशा भाजप मधील लहान मोठ्या सर्वच नेत्यांच्या संपर्कात आले. भाजपच्या विचारांनी प्रभावित होऊन रामदास पाटील सुमठाणकर यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देऊन सुमठाणकरांनी अपक्ष निवडणुक लढवावी असा संघटनेतील कार्यकर्त्यांचा दबाव त्यांच्यावर होता. त्यावेळी (Ramdas Patil Sumathankar) सुमठाणकरांनी अपक्ष उमेदवारीही दाखल केली होती. राज्यातील मंत्री गिरीष महाजन यांनी स्वतः हिंगोलीत येऊन त्यांचे मन वळविले. त्याच वेळी विधान सभेचा शब्द देण्यात आला होता.
भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. पक्षानेही त्यांना सुरूवातीलाच मोठी जबाबदारी दिली. हिंगोली लोकसभा मतदार संघात संघटनात्मक बांधणी करण्यासाठी सुरू असलेल्या लोकसभा प्रवास योजनेच्या प्रभारी पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रवास योजने दरम्यान रामदास पाटील यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे विणले. त्यांच्याकडे हिंगोली लोकसभेचे उमेदवार या दृष्टीने पाहीले जात होते परंतु हिंगोलीची जागा शिंदे यांच्या शिवसेनेला सुटल्याने सुमठाणकरांची संधी हुकली. वास्तविक लोकसभा निवडणुकीतच
सुमठाणकरांचे म्हणणे आहे. या विधानसभा निवडणुकीत पक्षातर्फे आपल्याला (Hingoli Assembly Elections) हिंगोलीची उमेदवारी मिळणार यासाठी त्यांनी मोठी तयारीही करून ठेवली होती. ऐनवेळी पक्षाने त्यांना उमेदवारी न देता आ. मुटकुळे यांचे नाव जाहीर केले. या पृष्ठभूमीवर अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या रामदास पाटील सुमठाणकर (Ramdas Patil Sumathankar) यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपण ही निवडणुक लढविणार व जिंकणार असा विश्वास व्यक्त केला.
उजवा डावा करून नेत्यांनी २५ वर्षे समाजाला मूर्ख बनविले
आप आपल्या समाजाचे ठेकेदार बनलेल्या आजी माजी आमदारांनी उजवा डावा करून २५ वर्षे समाजाला मूर्ख बनविले, असा आरोप रामदास पाटील सुमठाणकर (Ramdas Patil Sumathankar) यांनी सत्ता भोगलेल्या सर्व नेत्यांवर केला. स्वतःला आपल्या समाजाचा नेता म्हणणाऱ्या या पुढाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या समाजातील किती लोकांना मोठे केले, हे जनतेला दाखवावे असे आवाहनही सुमठाणकरांनी केले. याच नेत्यांच्या एका गावात समाजासाठी स्मशानभूमी नव्हती म्हणून लोकांना आंदोलन करावे लागले, हे सर्व समाजाला माहित आहे. कृषि उत्पन्न बाजार समिती सारखी कार्यकर्त्यांची निवडणुक आली की. हेच नेते एकत्रित येतात. आपला कार्यकर्ता उद्या आपल्यासाठी डोईजड होईल म्हणुन त्याला मोठा होऊ देत नाही.
आपली आमदारकी आपल्या मुलालाच का द्यावी वाटते, असा सवालही सुमठाणकरांनी हिंगोलीतील प्रस्थापित नेत्यांपुढे उभा केला. स्वतःच्या फायद्यासाठी ‘डावा- उजवा करणाऱ्या याच नेत्यांनी गावोगावी फूट पाडून ठेवली आहे. मतदार संघातील प्रत्येक गावात लोकांना दररोजच्या जीवनात गटबाजीचा त्रास झेलावा लागतो, हे ही समाजाला कळाले आहे. भारतीय जनता पक्षाचे बहुतांश कार्यकर्ते या निवडणुकीत आपल्याला मदत करणार असुन सर्वसामान्य मतदारांनी आता ही (Hingoli Assembly Elections) निवडणुक आपल्या हातात घेतली असल्याने या सर्व नेत्यांना जनताच घरी बसवणार आहे, असा दावाही सरते शेवटी रामदास पाटील सुमठाणकर (Ramdas Patil Sumathankar) यांनी केला.