Ramoji Rao:- रामोजी ग्रुपचे संस्थापक (Founder of Ramoji Group) रामोजी राव (Ramoji Rao) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. रामोजी राव गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. त्यांना ५ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे 4.50 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनाने उद्योग जगतावर शोककळा पसरली
रामोजी राव यांचे नाव चेरुकुरी रामोजी राव (Cherukuri Ramoji Rao) होते. रामोजी राव यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९३६ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. रामोजीरावांनी कष्ट करून व्यवसाय उभा केला होता. चित्रपटसृष्टीतही त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ रामोजी फिल्म सिटी,(Ramoji Film City) ईटीव्ही नेटवर्क (ETV Network) , डॉल्फिन हॉटेल्स (Dolphin Hotels), मार्गदर्शी चिट फंड (Margdarshi Chit Fund) आणि ईनाडू तेलुगु पेपर (Enadu Telugu Paper) सुरू केला. रामोजीरावांकडे अफाट संपत्ती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे ४.७ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. भारतीय चलनात ही रक्कम 41,706 कोटी रुपये आहे. रामोजी राव यांचा उषाकिरण मुव्हीज (Ushakiran Movies) नावाचा प्रोडक्शन व्हेंचर आहे. या बॅनरखाली आतापर्यंत अनेक सुपरहिट तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
भारत सरकारने रामोजी राव यांना प्रतिष्ठेच्या ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानेही सन्मानित
रामोजी राव यांनी 2002 मध्ये रमादेवी पब्लिक स्कूलची (Ramadevi Public School) स्थापना केली. भारत सरकारने रामोजी राव यांना प्रतिष्ठेच्या ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानेही सन्मानित (Also honored with ‘Padma Vibhushan’ award) केले. रामोजी राव यांनी चित्रपट रसिकांसाठी ‘सितारा’ मासिक सुरू केले. ‘चतुर’ आणि ‘विपुला’ मासिकेही आणली. ‘उषाकिरण मूव्हीज’ची स्थापना १८८३ मध्ये झाली. या बॅनरखाली अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. 1990 मध्ये रामोजी फिल्म सिटीमध्ये ‘इनाडू स्कूल ऑफ जर्नलिझम’ सुरू करण्यात आले.