हिंगोली (Raosaheb Danve) : शहरातील मधुर पॅलेस येथे 29 सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हा भाजपा, जिल्हास्तरीय बूथ मेळावा माजी मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी माजी आमदार जयपाल चावडा (छत्तीसगड), आमदार तान्हाजीराव मुटकुळे, माजी खासदार शिवाजीराव माने ,माजी आमदार तथा भाजपा उपाध्यक्ष गजाननराव घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष उज्वलाताई तांबाळे, रामदास पाटील सुमठाणकार, युवा सेना जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, हिंगोली शहराध्यक्ष कैलास काबरा,सेनगाव तालुका अध्यक्ष हिम्मत राठोड, हिंगोली तालुका अध्यक्ष माणिक लोंढे,युवा नेते शिवाजीराव मुटकुळे, प्रशांत गोल्डी व सर्व पदाधिकारी तथा बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शक माजी मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी कार्यकर्त्यांनी खचून न जाता नव्या जोमाने विधानसभेसाठी कामाला लागावे असे सांगितले. यावेळी विजय निश्चित आपलाच आहे असे भाषणातून बोलताना सांगितले. तसेच विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र दामोदर मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या निबंध स्पर्धेचे सन्मानपत्र मानचिन्ह यावेळी मान्यवराच्या हस्ते देण्यात आले. सदरील स्पर्धेचे आयोजन माजी सरचिटणीस तथा भाजपा उपाध्यक्ष मिलिंद यंबल यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पेंडके यांनी केले.