संत भगवान बाबा उद्यानात विकास कामे उद्घाटन व संत भगवान बाबा मंदिर भूमिपूजन सोहळा
हिंगोली (MLA Tanajirao Mutkule) : दिनांक 15 सप्टेंबर रोजी येथील राष्ट्रीय संत भगवान बाबा उद्यान एन. टी. सी. हिंगोली येथे आ. तान्हाजीराव मुटकुळे (MLA Tanajirao Mutkule) यांच्या स्थानिक निधी तसेच जिल्हा नियोजन व स्थानिक निधीतून मधून एक कोटी सभागृह , उद्यान सौंदर्यकरण 80 लक्ष , 15 लाख रुपये स्ट्रीट लाईट विकास कामे व श्री संत भगवान बाबा (Rashtrasant Bhagwan Baba) यांच्या मंदिराची भूमिपूजन व उद्यानाचा उदघाटन सोहळा पार पडला.
सर्वपक्षीय नेते व विविध समाजातील नागरिकांची कार्यक्रमाला उपस्थिती
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार गजाननराव घुगे होते, उद्घाटक आमदार तानाजीराव मुटकुळे (MLA Tanajirao Mutkule), प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बि.डी बांगर ,भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, भाजपाचे नेते रामदास पाटील सुमठाणकर, आयोजक नगराध्यक्ष बाबारावजी बांगर ,श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मेजर पंढरीनाथ घुगे, एकनाथराव कूटे प्रकाश बांगर, विश्वासराव बांगर, विश्वनाथ घुगे, एडवोकेट केके शिंदे, नारायणराव खेडकर, प्राध्यापक दुर्गादास साकळे, गोवर्धन वीरकुवर, विशाल घुगे मानकरी आदी मान्यवर याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमास शेकडोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना बाबाराव बांगर य म्हणाले की उद्यानाच्या निधीतून विकासाबरोबर राष्ट्रसंत भगवान बाबा (Rashtrasant Bhagwan Baba) यांचे भव्य मंदिर लोकवर्गणीतून उभारणार आहे. सर्व कामाचा दर्जा हा अतिउत्तम राहील. जिल्हाध्यक्ष बिडी बांगर यांनी उद्यान विकास करत असताना सर्व तांत्रिक गोष्टी पाहून भगवान बावा भव्य दिव्य मंदिर उभारत असताना विकास कामासोबत उद्यानातील प्रत्येक गोष्ट हा या समाजाच्या आस्थेशी जोडलेला असल्यामुळे कायदा आणि चौकट यांच्या सगळ्या गोष्टी पालन करून त्या ठिकाणी विकास कामे होतील हा असा आशावाद व्यक्त केला.
हिंगोली विधानसभेचे आमदार सन्माननीय तानाजीराव मुटकुळे (MLA Tanajirao Mutkule) यांनी विकास कामासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही तसेच लोक वर्गणीतून होणाऱ्या भव्य मंदिरासाठी शुभारंभ करिता वर्गणी देत कार्यक्रमाचे उद्घाटन केले. माजी आमदार गजाननराव घुगे यांनी अध्यक्ष समारोप केला. मंदिर तांत्रिकदृष्ट्या योग्य होण्यासाठी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. तत्कालीन मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सामाजिक काम करत असताना अडचणी सोडवण्याचे व तांत्रिक गोष्टीत सल्ला देण्याचे मान्य करत या सोबतच इतर प्रत्येक समाजाच्या भावना ज्या ठिकाणी जोडलेले आहेत त्या ठिकाणी उत्तम काम होईल हा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर पंढरीनाथ घुगे यांनी तर आभार प्रदर्शन संजय बांगर यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा, जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे, शहर अध्यक्ष कैलास काबरा,प्रशांत सोनी, उमेश गुठ्ठे, संतोष टेकाळे, कल्याण देशमुख संदीप नागरे शिवाजी घुगे, राज तांदळे , बालाजी घुगे, आशिष जयस्वाल, राहुल बांगर, लक्ष्मण बांगर, श्रीरंग राठोड,भगवान, उत्तमराव जगताप प्रकाश धोंडीबाराव बांगर, दत्तराव बांगर कबड्डी, वैजनाथ बांगर, दत्तराव भिकाजी बांगर, केशव बांगर, बाबा घुगे, निवास घुगे, गंगाधर बांगर चेअरमन,अभियंता नाईक संत भगवान बाबा प्रतिष्ठानचे संजय बांगर, सुधीर वाघ, विशाल मानकरी, बाळू बांगर नाना बांगर, ऍड बापूराव बांगर, राजू पाटील, विश्वनाथ दराडे कैलाश बांगर, विशाल घुगे, राज तांदळे,सचिन बांगर, सुनील बांगर राज बांगर, गोपाल बांगर, गजानन बांगर,रवी गुट्ठे, रोहन बांगर साईनाथ बांगर, संजय चाटे संजय चाटे व राष्ट्रीय संत भगवान बाबा प्रतिष्ठान सर्व सभासद व एनटीसी भागातील सर्व समाजातील सर्व समाज बांधव विविध पक्षांचे नेते व वंजारवाडा एनटीसी व हिंगोली शहरातील सर्व सुज्ञ नागरिक व पत्रकार, डॉक्टर्स, विधीतज्ञ उपस्थित होते.
