मानोरा (Washim):- तालुक्यातील दापुरा ते चौसाला मुंगसाजी महाराज देवस्थान धामणगाव कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असुन याबाबत संबंधित अभियंता, उपअभियंता व कंत्राटदार यांनी केलेल्या कामाची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी, याबाबत संबंधित विभागाकडे लेखी तक्रार करूनही चौकशी होत नसल्याने उद्या दि. १२ ऑगस्ट रोजी कारंजा – मानोरा रोडवर गावकरी मंडळीसह रास्ता रोको आंदोलन करणार असे निवेदन जिल्हाधिकारी यांना माजी प. स. सदस्य मधूसुदन राठोड यांनी दिले आहे.
उच्च स्तरीय चौकशी होणे संदर्भात सोमवारी रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले
निवेदनात नमूद केले आहे की, दापुरा ते चौसाला या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे (Poor quality) करण्यात आल्यामुळे एका महिन्यातच रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहे. सदरील रस्ता हाताने उखरून पाहिले की रस्त्यावर खड्डे पडत आहे. रस्ता कामाची चौकशी करणेसंदर्भात अभियंता, उप अभियंता याजकडे लेखी तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही. संबंधितांनी संगनमतीने लाखो रुपयांच्या रस्ता कामाची उच्च स्तरीय चौकशी होणे संदर्भात सोमवारी रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले आहे. असे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.