पुसद (Rasta Roko Andolan) : बंजारा समाजासाठी लढणाऱ्या गोर सेनेच्या वतीने दि. 30 सप्टेंबर रोजी महाआक्रोश मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गोर सेनेचे तालुकाध्यक्ष जय राठोड यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय व पुसद पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले होते. पीडित कुटुंबाला अजूनही न्याय मिळालेला नाही. दिवसेंदिवस बंजारा समाजावर अन्याय, अत्याचार, लैंगिक अत्याचार वाढत आहेत. एका 19 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार होऊन सुद्धा आरोपीवर कलम 354,354(अ ), 342 व 506 याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
त्यानंतर आरोपीवर कलम 376 भादवी वाढीव कलम लावण्यात आली. परंतु गंभीर गुन्ह्याची नोंद असूनही पोलिसांमार्फत आरोपीला अटक करण्यात आली नाही.तर मांडवा येथील सुरेश राठोड या युवकाच्या मृत्यू बाबत अजूनही सखोल चौकशी झालेली नाही. कुटुंबाला अद्याप न्याय मिळालेला नाही. या मागण्यांसाठी गोर सेनेच्या वतीने आज महा आक्रोश मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी गोर सेनेच्या वतीने प्रशासनाला दिवसाचा अवधी देण्यात आला असून या काळात पीडित कुटुंबाला न्याय न मिळाल्यास पुढील काळात मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला. प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात तैनात होता. उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिर्जे ( आयपीएस ), शहर ठाणेदार उमेश बेसरकर, वसंत नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश जाधव, गोपनीय विभागाचे नितेश भालेराव, अभिमन्यू चव्हाण, अरविंद चव्हाण यांच्यासह दोन्ही पोलीस स्टेशनचे डीपी पथक प्रमुख निलेश देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक, अशोक चव्हाण, मुन्ना आडे, संजय पवार यांच्यासह महिला अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नगीना शेख, एटीएसचे शेख जलाल इत्यादी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.