पुसद (Rasta Roko Andolan) : धनगर समाजाला आदिवासी तून आरक्षण देऊ नये या मागणी करिता दि. 30 सप्टेंबर रोजी आदिवासी समाजाच्या विविध संघटना यांच्या मार्गदर्शनात येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य जन आंदोलन उभे करून रास्ता रोको करण्यात आला. आदिवासी यांना आपले हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासह त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आक्रमकपणे रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, तालुका अध्यक्ष मारोती भस्मे यांच्या सह समाजाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आदिवासी विकास परिषद, आदिवासी पॅंथर संघटना, आदिवासी क्रांती दल, व इतरही सामाजिक संघटनेसोबतच वंचित बहुजन आघाडीचा या आंदोलनाला पाठिंबा दिला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर हेच धांगड(धनगड) असुन आदिवासी समाजात धनगर जातीचा समावेश करण्याचा जिआर काढणार आहे. असे वक्तव्य केले होते. यावेळी नायब तहसीलदा कदम यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनावर या रास्ता रोको आंदोलनाचे आयोजक बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, तालुकाध्यक्ष मारोती भस्मे, महिला ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष सुनीता मळघणे, यांच्यासह आदिवासी पॅंथरचे, सुरेश धनवे, देविदास डाखोरे, आदिवासी विकास परिषदेचे सुनील ढाले, गजानन टारफे, संतोष गारोळे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, जयानंद उबाळे, संदीप आढाव, बिरसा ब्रिगेडचे संघटक संजय डुकरे, उपाध्यक्ष विठ्ठल मिरासे, सखाराम इंगळे, अक्षय व्यवहारे, अर्जुन हगवणे, गजानन उघडे, गजानन टाले, शंकर ढगे, बजरंग ढगे, समाधान बळी, दत्ता खंदारे, प्रदीप घावस, नारायण कराळे, अमोल पाचपुते, आकाश मस्के, अमोल बेलगव्हाणे, राजू पेदेवाड, सचिन आत्राम, सुरेश सिडाम, महिला बिरसा ब्रिगेडच्या छाया बळी, उषा टारफे,सुनीता जंगले, मीनाक्षी व्यवहारे, महानंदा वंजारे, अनिता अगोसे, वंदना मस्के यांच्यासह हजारोंनी या रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला होता. यामध्ये विशेषता सर्व आदिवासी समाज संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, मजुर वर्ग, कर्मचारी तसेच महिला पुरुष यांनी दर्शवली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.