कारंजा/वाशिम (Rastraroko Andolan) : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी (Bhumiputra Farmers Association) भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्यावतीने १ जुलै रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास स्थानिक सावरकर चौकात रास्तारोको आंदोलन (Rastraroko Andolan) करण्यात आले.
एप्रिल महिन्याच्या उन्हाळी पीक नुकसानीचा मोबदला देण्यात यावा, सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेनुसार घोषित मदतीचे वाटप करावे, राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करावे, पीककर्ज वाटपास दिरंगाई करणाऱ्या व शासकीय धोरणानुसार पीककर्ज वाटप न करणाऱ्या सहकारी, खाजगी, राष्ट्रीयकृत बँकावर कारवाई करण्यात यावी, तुषार सिंचन व ठिबक सिंचन योजनेचे कृषी खात्याने अनुदान द्यावे, अतिवृष्टीचे अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळाले नाही, त्यांना लवकरात लवकर देण्यात यावे. या मागण्यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी कर्जमाफी, पीक नुकसान भरपाई व अन्य शेतकरी हिताच्या घोषणा दिल्या. (Bhumiputra Farmers Association) भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील लांडकर, युवा तालुकाध्यक्ष सतीश मालवे, प्रकाश लांडकर, अभिजीत जाधव, संजय काकडे, मनोहर चव्हाण, अमोल उगले, अनिल गावंडे, पंकज इंगळे, आकाश मोहोकार यांच्यासह अन्य शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. (Rastraroko Andolan) आंदोलनादरम्यान (Karanja City Police) कारंजा शहर पोलीस स्टेशनच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता .