हिंगोली(Hingoli):- बळसोंड भागातील विजेच्या समस्याबद्दल महावितरण कंपनीकडे(Maha distribution company) निवेदन देऊनही योग्य उपाय योजना केल्या नसल्याने ८ जुलै रोजी अकोला बायपास बळसोंड येथे परिसरात भाजपा युवा मोर्चा(BJP) जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
येत्या पंधरा दिवसात समस्या सोडविण्याचे महावितरण कंपनीने दिले लेखी आश्वासन
हे आंदोलन समस्या सोडवण्यासाठी करण्यात आले होते. या आंदोलनात परिसरातील नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते. मागील बर्याच दिवसापासून परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित केला जातो व कुठलेही कारण न देता कधीकधी तर रात्रभर व दिवसाही वीज पुरवठा (Power supply) होत नाही परिसरात जवळपास ९० टक्के कर्मचारी वर्ग राहतो व लाईट बिल वेळेत भरणारा वर्ग असताना सुद्धा ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न होत नव्हते त्यामुळे ८ जुलै सोमवार रोजी रास्तारोको आंदोलनात भारतीय जनता युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
मोठे आंदोलन करण्याचा इशारा
या आंदोलनात दिलीप माने, सुमित घिके, जयदेव माने, विनय गायकवाड, सुमित गीते, पप्पू देवकते, सत्येंद्र नालटे, विवेक देशमुख, ज्ञानदेव मांदळे, शिवाजी मांदळे, दिपक हिरास, शरद बेद्रे, रवी गायकवाड, अशोक लोंढे, उज्वला खोलगाडगे, अमोल भन्साळी, शिवाजी लोमटे, ज्ञानेश्वर राऊत, शिवाजी मांदळे, रितेश मुंदडा, अनिल मंदाडे, सुबोध भिसे, क्षीरसागर, अनिल वाघमारे, राहुल बलखंडे यांच्यासह सर्वांनी पाठिंबा दिला.या ठिकाणी वीज वितरण कंपनीच्यावतीने सहाय्यक अभियंता मोरे उपकार्यकारी अभियंता सचिन बेलसरे यांनी विजेची ही समस्या सोडवण्यासाठी लेखी आश्वासन पत्र दिले. येत्या पंधरा दिवसात यावर तोडगा निघाला नाही तर याहीपेक्षा मोठे आंदोलन करण्याचा इशारा भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांनी अधिकारी वर्गाला दिला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.