मानोरा (Washim):- महविकास व महायुती आघाडीने बंजारा समाजाच्या उमेदवाराला आमदारकीची तिकीट न दिल्यास आगामी विधानसभा निवडणुक (Assembly Elections) कारंजा – मानोरा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्धार युवा नेता माजी प. स. सदस्य मधुसूदन राठोड यांनी केला आहे.
महायुती किंवा महाविकास आघाडीने समाजाला तिकीट द्यावी
मतदार संघात बंजारा समाजाचे ६० हजाराच्या जवळपास मतदार आहेत. महायुती व महाविकास आघाडी पैकी एका आघाडीने बंजारा समाजाच्या उमेदवाराला तिकीट देवून निवडणुकीच्या रिंगणात उतरविणे गरजेचे आहे. पण प्रत्येक वेळी अन्याय केला जात आहे. सन २०१४ मध्ये मनसेने मतदार संघातील बंजारा उमेदवार म्हणून रणजित जाधव यांना उमेदवारी दिली होती, तेंव्हा त्यांना मनसेच्या तिकिटावर ३० हजाराच्या जवळपास मते मिळाली होती. यावेळी बंजारा समाजाच्या गठ्ठा मतांच्या भरोश्यावर अपक्ष निवडणूक का लढवू नये. याचा पुनरुच्चार करून अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय मी, घेतला असल्याची माहिती मधुसूदन राठोड यांनी दिली.