मानोरा (Ration Card holders) : सार्वजनिक प्रणाली अंतर्गत (Ration Card) रेशन धारकांना ई – पॉस मशिनद्वारे (E-POS machine) धान्याचे वितरण येते. मात्र ही सुविधा अनेक वेळा तांत्रिक अडचणीमुळे बंद पडते. त्यामुळे रेशन धारक लाभार्थी व रेशन दुकानदारामध्ये वाद-विवाद होऊन विकोपाला जातात. त्यामुळे आता शासनाने ऑफलाईन धान्य वाटपास ३० जुलै रोजी एका आदेशाव्दारे मंजुरी दिली आहे.
यापूर्वी केंद्र शासनाने अन्न धान्य वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने अपवादक परिस्थितीमध्ये (offline grain distribution) ऑफलाईन धान्य वाटप करण्याकरिता रास्त भाव दुकान निहाय लॉगिन तयार करण्याच्या सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालयाने मंगळवार रोजी एका आदेशान्वये राज्यातील रास्त भाव दुकानदारांचे लॉगिन आयएमपिडीएस पोर्टलवर तयार करण्यात आले असुन ज्या रास्त भाव दुकानाचे लॉगिन आयएमपिडीएस पोर्टलवर तयार करण्यात आले नसतील अश्या रास्त भाव दुकानाचे लॉगिन तात्काळ तयार करण्यात यावे.
राज्यातील सर्व्हरशी संबंधित तांत्रिक अडचणीचे निराकरण होईपर्यंत एक विशेष बाब म्हणून (offline grain distribution) ऑफलाईन धान्य वितरणास परवानगी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याकरिता ऑफलाईन अन्न धान्याचे वितरण शासकिय अधिकारी; कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात यावे व त्यांनी त्याबाबतच्या नोंदी प्रमाणित कराव्यात, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे माहे जुलै २०२४ मधील अन्न धान्य वितरण करिता ऑफलाईन सुविधा उपलब्ध राहणार आहे.
संगकीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगाकीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक ओळख पटवून अन्न धान्य वितरण करीता रास्त भाव दुकानामध्ये ४ जी तंत्र ज्ञान असलेल्या (E-POS machine) ई – पॉस मशीन देण्यात आले आहे. राज्यात काही दिवसापासून रास्त भाव दुकानमधील (E-POS machine) ई पॉस मशीन मधून अन्न धान्य वितरण करतांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या (Ration Card) तांत्रिक समस्यामुळे अन्न धान्याचे वितरण लाभार्थ्यांना करतांना सर्व समस्येमुळे वादविवाद निर्माण होवून विकोपाला जातात.