तुपकरांच्या लढणारा उमेदवार देणार वाक्यावरून विनायक सरनाईक यांचे नाव आले चर्चेत
देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (Ravikant Tupkar) : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिखली विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक चिखलीतील मौनीबाबा संस्थान येथे पार पडली. याबैठकीत सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यांसह शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलनाची दिशा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत (Ravikant Tupkar) रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असुन त्यांनी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला सर्वाच्या भावना जाणून घेतल्या.
रविकांत तुपकरांवर टिका करणाऱ्यांवर विनायक सरनाईक यांचा प्रहार
तर कुणाचेही नाव न घेता शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी लढणारा उमेदवार देणार असल्याची घोषणा त्यांनी केल्याने चिखली विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांसाठी लढणारा चेहरा म्हणून विनायक सरनाईक उमेदवार असु शकतात यावर शिक्कामोर्तब झाले नसले तरी विनायक किवा नितिन राजपुत यांचे नाव चर्चेत आले आहे. तर रविकांत तुपकर यांनी शेतकरी- कष्टकऱ्यांसाठी लढणारा उमेदवार म्हटल्याने स्वतः तुपकर सुद्धा या मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरू शकतात.. त्यामुळे (Ravikant Tupkar) रविकांत तुपकर यापैकी कोण्या उमेदवाराची घोषणा करतात की आणखी कुणाला महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीकडुन संधी देतात हे लवकरच स्पष्ट होईल.रविकांत तुपकर यांनी मतदार संघातील राजकारण व शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा पाढा देखील वाचला… विशेष म्हणजे या बैठकीत विनायक सरनाईक यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलतांना विनायक सरनाईक यांनी चिखली मतदार संघात निवडणुकांच्या तोंडावर सुरु असलेल्या सत्ताधारी व विरोधकांकडुन सुरु असलेल्या मतदार संघातील राजकारणावर सडकुन टिका केली.
सरनाईक म्हणाले, आम्ही गेल्या पंधरा वर्षांपासून शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी यांच्या प्रश्नावर लढतोय आम्हाला कोणतीही निवडणूक लढवायची नव्हती तेंव्हा (Ravikant Tupkar) रविकांत तुपकर असतील किंवा आम्ही असो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमकपणे रस्त्यावर उतरायचो, शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी केलेल्या आनंदोलनाचे शेकडो गुन्हे कार्यकर्ते व शेतकऱ्यांवर दखल आहेत.
आज काही नेते सोयाबीन – सोयाबीन, पिकविमा-पिकविमा करत आहे. ते नेते चाडेचार वर्षे कुठे होते. जेव्हा रविकांत तुपकर यांनी जिल्ह्यात पक्ष विरहीत मोर्चे काढले तेव्हा हे नेते का शेतकरी हितासाठी सहभागी झाले नाही. आम्ही चिखलीत शेतकऱ्यांच्या समस्या घेवून पिक विमा प्रश्न व विविध शेतकरी हिताचे प्रश्न घेवून पाच वर्षांपासून सतत आंदोलने करत होतो, तेव्हा हे रविकांत तुपकरांवर टिका करणारे नेते कुठे गेले होते…?तेव्हा निवडणूका नव्हत्या म्हणून मिस्टर इंडीया झाले होते का…?असा टोला सरनाईक यांनी लावला असुन आज जिल्यातील नेत्यांच्या तोंडी सोयाबीन, कापूस, पिकविमा शब्द येणे म्हणजेच हे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या सततच्या आंदोलनाचे आणि शेतकऱ्यांनी लोकसभेला दाखवलेल्या एकजूटीचे यश आहे, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. तर रविकांत तुपकर यांच्यावर बोलण्यापुर्वी १५ वर्ष तुम्ही कुठे होता, तुम्ही डायरेक्ट निवडणूकीत लोकांसमोर आला हे जनता विसरली नाही.
तुपकरांच्या आंदोलनामधून शेतकऱ्यांना काय मिळाले हे सर्वश्रुत आहे. परंतु तुम्ही जे आंदोलने करता यामधे फक्त राजकारण दिसते आणी टिकेची झोड दिसते… तुम्हाला जर खरचच वाटत असेल शेतकऱ्यांना न्याय मिळावा तर आम्ही तीन वर्षांपासून नारा दिला आहे. “पक्षाचे झेंडे बाजुला ठेवू… शेतकरी म्हणुन एकत्रीत येवू..!” तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनात का सहभागी झाले नाही,असा सवाल विनायक सरनाईकांनी उपस्थित करत सत्ताधारी व विरोधकांवर जोरदार टीका केली. तर (Ravikant Tupkar) रविकांत तुपकर यांनी घेतलेल्या बैठकीनंतर आणी घोषणा केल्या नंतर शेतकऱ्यांसाठी परीचीत असा चेहरा असलेले विनायक सरनाईक, नितिन राजपुत यांना उमेदवारी देतात कि आनखी कुणी नौखा उमेदवार देतात कि स्व:ता हा मैदानात उतरतात हे लवकरच कळेल लोकसभेला रविकांत तुपकर यांनी ४५ हजार मतदान चिखली मतदार संघात घेतले असल्याचे विसरुन चालणार नाही..