लातूर (Ravikant Tupkar food sacrifice Andolan) : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी नावाच्या गरीब परंतु जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला न्याय मिळावा, त्याच्या काबाडकष्टाला अन् घामाला उत्पादन खर्चावर आधारित दाम मिळावा, म्हणून शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) हे जिजाऊ माँसाहेब यांच्या मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील राजवाड्यासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलनास (food sacrifice Andolan) बसले आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी लातुरात शेतकऱ्यांनी आत्महत्याचे प्रात्यक्षिक करुन एकच खळबळ उडवून दिली.
त्यांना समर्थन देण्यासाठी दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा फुले, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नतमस्तक होत लातूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र मोरे, सत्तार पटेल, अरुणदादा कुलकर्णी, राजकुमार सस्तापुरे, राजीव कसबे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
तुपकर (Ravikant Tupkar) यांनी सातत्याने सरकार विरोधात शेतकरी, शेतमजूर, निराधार, तरुण बेरोजगार, महिला यांच्या प्रश्नावर जातीसाठी ना पातीसाठी आमचा लढा काळ्या मातीसाठी या उदघोषाने असूड ओढण्याचे काम केले आहे. पक्षाचे झेंडे बाजूला ठेऊ शेतकरी म्हणून एकत्र येऊ या न्यायाने ते (food sacrifice Andolan) अन्नत्याग करुन निकराचा संघर्ष करीत आहेत.
लातुरात मेन रोडने शेतकरी आंदोलकांनी (Farmer Andolan) हातात चाबूक घेऊन, स्वतःच्या गळ्याला फास लावून घेत वेगवेगळी अंगावर फलक लावून लोकांचे लक्ष वेधून घेत सरकारचा निषेध करीत मोर्चाने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज मुक्ती, सोयाबीन ला 9000 रू भाव, कापसाला 12500 रू भाव, ठिबक तुषारचे राखडलेले अनुदान, ओला दुष्काळ जाहीर करुन आर्थिक मदत, पीकविमा, इत्यादी मागण्या मान्य कराव्यात आणि रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या जीवितास धोका झाल्यास सरकार जबाबदार असेल असं म्हटले आहे.
आंदोलनात दगडूसाहेब पडिले, अशोक दहिफळे, हरिचंद कंबोज, शरद रामशेटे, बालाजी सूर्यवंशी, वसंत आबा कांदगुळे, माधव कवठाळे, रामदास आबा गिरी, रामराव मेळकुंदे,संजय जगताप,आत्माराम शिंदे पाटील,दत्ता किणीकर, संपत गायकवाड, सुरेश सूर्यवंशी, मुस्तफा देशमुख, सावन गवळी, जीवण कसबे, आदेश कसबे, शिवाजी कसबे, लक्ष्मण कसबे, साधू कावळे, हणमंत सुरवसे, संदीपान सुरवसे, सुनंदा पाटील, शीतल तमलवार, बेबीनंदा, अनुसया ताई, पद्मिनी कसबे, सखुबाई बनसोडे, प्रकाश बनसोडे, नजीर शेख, लहू कांबळे, मुक्ताराम काळे, भीमसेन क्षीरसागर, रामेश्वर पाटोदेकर, लक्ष्मण कांबळे, अनंत दोडके पाटील, दिपक गंगणे, दत्तू बनसोडे, रावसाहेब केसरकर, राधा कुलकर्णी, जयंत कुलकर्णी, अशी असंख्य शेतकरी सहभागी झाले होते.