मतदारामध्ये गावा गावात चर्चा
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali assembly elections) : यावर्षी चिखली विधानसभा निवडणुकीत महापशातून विविध पक्ष निवडणूक लढवणार असले, तरी खरी रस्सीखेच भाजपच्या उमेदवार श्वेता ताई महाले (Shweta Mahale) व काँग्रेसचे उमेदवार राहुल बोन्द्रे (Rahul Bondre) यांच्यातच होणार आहे, असे एकंदर विद्यमान राजकीय स्थितीवरून प्रकर्षाने जाणवते. मागील निवडणुकीवेळी जी राजकीय स्थिती महापशात होती, नेमकी तीच स्थिती यंदाही असेल. कारण मुख्य लढत त्याच दोन्ही पक्षांत आणि त्याच उमेदवारांत होत आहे. अशी राजकीय चर्चा गावागावात मतदार करीत आहेत.
विधानसभा निवडणुकीची (Chikhali assembly elections) रणधुमाळी सुरू झाली असून या आधी कधी बघितला नाही असा घनघोर रणसंग्राम या निवडणुकीत पाहलायला मिळणार आहे. मागील काळा मध्ये ज्या पद्धतीने महायुती सरकारने लाडकी बहीण, टोल माफी, गॅस, मोफत प्रवास असे अनेक निर्णय घेतले होते परंतु शेतकऱ्यांना सरसकट पीककर्ज माफी दिली नाही, शेत मालाला भाव दिला नाही.अतिवृष्टीची नुकसान भरपाई नाही, पिक विमा नाही त्यामुळे पुन्हा महायुतीला विधानसभा निवडणूक जिकणे पाहिजे तशी सोपी नाही. जनता विविध जाचक अटीमुळे चांगलीच पिचलेली आहे.
त्यामुळे या (Chikhali assembly elections) निवडणुकीत उमेदवारांना पक्ष श्रेष्ठीच्या करिष्म्यावर अवलंबूनन राहता स्वतः च्या जबाबदारीवर आणि केलेल्या विकास कामावर मतदारांची मने जिकावी लागणार आहे. संध्या राजकीय घडामोडी पाहता पक्ष श्रेष्ठीचे नेते आपली ताकद लावून उमेदवारांच्या पाठीमागे राहून मैदानात उतरून आपले उमेदवार जास्तीत जास्त कसे आमदार होतील यासाठी विविध योजनेचे आमिष दाखववुन विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत.त्यात निवडणुकीच्या मैदानात उतरलेले इच्छुक उमेदवार दररोज गावा गावातील मतदारांची मते जुळवा जुळव करुण मतदारावर खर्चाचा भाडीमार सुरु केला आहे.
संध्यातरी सर्वच उमेदवार म्हणतात की आपण जास्तीत जास्त मताने विजयी होवू कारण आजच्या निवडणुकीत 24 इच्छुक उमेदवार रिंगणात आहेत आणि विजयी होण्यासाठी कमी मतदान लागेल. त्यामुळे चिखली विधानसभा निवडणुकीत महापशातून विविध पक्ष निवडणूक लढवणार असले,तरी खरी रस्सीखेच भाजपच्या उमेदवार श्वेता ताई महाले व काँग्रेसचे उमेदवार राहुल बोद्रे यांच्यातच होणार आहे, असे एकंदर विद्यमान राजकीय स्थितीवरून प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे आता उमेदवारापेक्षाही आता मतदार हुशार झाल्याने कोणाच्याही भुलथापांना बळी न पडता योग्य उमेदवालाच निवडून देणार आहे, हे मात्र खरे…