नागपूर (Nagpur) :- पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील (Nagpur Assembly) लढत आता चुरशीची होत चालली आहे. काँग्रेस उमेदवाराला पाडण्यासाठी उभ्या असलेल्या अपक्ष नरेंद्र जिचकार (Narendra Jichkar)ह्यांनी आता तगडे आवाहन उभे केल्याचे काँग्रेसचेच (Congress)नेते बोलू लागले आहेत.
नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात 20 उमेदवार रिंगणात
नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात 20 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसचे विकास ठाकरे(Vikas Thakre), भाजपचे सुधाकर कोहळे (Sudhakar Kohale), वंचित बहुजन आघाडीचे यश गौरखेडे आणि बहुजन समाज पार्टीचे प्रकाश गजभिये हे राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आहेत. यात अपक्ष म्हणून नरेंद्र जिचकार हे रिंगणात आहेत. काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष असलेले विकास ठाकरे यांच्यासोबत असलेल्या वादातून नरेंद्र जिचकार यांनी विकास ठाकरे यांना पाडण्याचा विडा उचलला. त्यातूनच त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केला. अपक्ष म्हणून ते रिंगणात असेल तरी त्यांचा फारसा जोर मतदारसंघात नाहीच.
भाजपचे सुधाकर कोहळे यांना पार्टीचे उमेदवार असल्याचा फायदा मिळणार
दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांना पार्टीचे उमेदवार असल्याचा फायदा मिळणार आहे. मात्र सुधाकर कोहळे यांना ऐन वेळी भाजपने दक्षिणमधून आयात केले. पश्चिम नागपूर मधील अनेक स्थानिक उमेदवार रांगेत होते. मात्र त्या सर्वांना डावलून कोहळे यांना उमेदवारी मिळाल्याने काही प्रमाणात का होईना, भाजप(BJP) उमेदवाराला अंतर्गत नाराजीचा सामना करावा लागणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे विकास ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत. जनसंपर्क दांडगा असला तरी वंचित बहुजन आघाडीचे यश गौरखेडे आणि बहुजन समाज पार्टीचे विनोद रंगारी यांच्यासह अपक्ष नरेंद्र जिचकार यांच्या रूपाने होणाऱ्या मतविभाजनाचा फटका ठाकरे यांना बसू शकतो. हे मतविभाजन थांबविण्याचे मोठे आव्हान त्यांच्या पुढ्यात आहे.