नागपूर (Union Minister Amit Shah) : यंदाची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जायचे आहे. महायुतीत आणि भाजपात उमेदवार दिल्यानंतर पक्षातील नेत्यांनी त्या उमेदवाराला निवडून आणायचे आहे. जिंकण्यासाठी काम करायचे आहे. कुठल्याही परिस्थितीत बंडखोरी खपवून घेणार नाही, असा इशाराच भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित भाजप कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्यासह आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. अमित शाह (Amit Shah) यांनी यावेळी विधानसभा निवडणुकांची रणनीती सांगत मार्गदर्शन केले. मतदारसंघातील बूथवर विशेष लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकारी व नेत्यांना केले. भाजपला विदर्भच महाराष्ट्राची निवडणूक जिंकून देईल, असे ते (Amit Shah) म्हणाले.
निवडणूक जिंकण्याचा मंत्र अमित शाह (Amit Shah) यांनी यावेळी सांगितला. ते म्हणाले, गाव पातळीवर निवडणूक हरलेल्या सरपंचपदाच्या उमेदवारांना पक्षात घेण्याचा प्रयत्न करा. विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बूथ वर दहा टक्के मत वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. नेते हेदेखील पक्षाचे कार्यकर्तेच आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे. केवळ कार्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, प्रत्यक्ष बुथवर जाऊन काम करावं लागेल, अशा शब्दात अमित शाह यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही बैठकीत कानपिचक्या दिल्या. प्रत्येक बूथवरील विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवरही लक्ष केंद्रित करा, त्यांना जोडण्याचे प्रयत्न करा. भाजपात विधानसभा निवडणुकांवेळी मतदारसंघात गटबाजी मुळीच खपवून घेतली जाणार नाही. उमेदवारी मिळाली नाही, म्हणून नाराजी हे मी बिलकुल सहन करणार नाही, अशा शब्दात राजी-नाराजीवर अमित शाह (Amit Shah) यांनी पदाधिकाऱ्यांना इशारा दिलाय.
पुढील काही दिवसांत पुन्हा एकदा सणासुदीचे दिवस आहेत, त्यात नवरात्रीमुळे सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असणार आहे. यावेळी, कार्यक्रम व उत्सवासाठी लोकं एकत्र येतात. त्यामुळे, विजयादशमी ते धनत्रयोदशीपर्यंत प्रत्येक बुथवर तरुण कार्यकर्ते फिरले पाहिजे, अशा सूचनाही अमित शाह (Amit Shah) यांनी कार्यकर्त्यांना केल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ‘राज्यात पाच वर्षे भाजपचे सरकार होते. या दरम्यान अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. महाराष्ट्रासह विदर्भाच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केले होत्या. मात्र महाविकास आघाडीने ते बंद पाडण्याचे काम हाती घेतले होते. भाजपच्या नेत्यांचे खच्चीकरण सुरू केले होते. पाच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार कायम राहिले असते, तर आगामी विधानसभेची निवडणूक (Assembly Election) लढण्यासाठी आपल्याला प्रचंड संघर्ष करावा लागला असता.’ तसेच ‘आज आपल्याला विधानसभेचा निकाल जो आपल्या बाजूने दिसत आहे तो महायुतीचे सरकारामुळे आहे. या दरम्यानही आपण राज्याच्या विकासाचे आणि सर्वासामान्यांचे हिताचे निर्णय घेतले आहे. त्यामुळे पुढचे पाच वर्षे आपलेच सरकार येणार आहे.’ असेही ते (Devendra Fadnavis) म्हणाले.
‘लोकसभेच्या निवडणुकीत (Assembly Election) विरोधकांचे खोटे नॅरेटिव्ह मतदारांच्या लक्षात आले आहेत. जो समाज आणि शेतकरी भाजपच्या विरोधात गेला होता त्यांना त्यांची चूक आता लक्षात आली आहे. संविधान कोणी बदलू शकत नाही ही भीती ता आता जनतेच्या मतानतून निघून गेली आहे. त्यामुळे दलित व आदिवासी बांधवा हेसुद्धा सकारात्मक झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते तेही केंद्र व राज्य सराकारने सोडवले आहेत. एकंदरित विधानसभेच्या निवडणूक महायुतीसाठी परिवर्तनाची ठरणार आहे.’ असा विश्वास यावेळी फडणीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.