हरवलेल्या ६ मुलांमुलींना पालकांच्या केले स्वाधीन
हिंगोली (Hingoli Police) : ७ ते १३ ऑक्टोंबर दरम्यानच्या कालावधीत दामिनी पथकाने अनेक ठिकाणी दिलेल्या भेटी दरम्यान तब्बल ३९ टवाळखोरांवर कारवाई केली. ही कारवाई आतापर्यंतची सर्वाधिक मोठी आहे.
हिंगोली शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन, मुख्य बाजारपेठ व इतर गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही महिलांसह मुलींची छेडछाड होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दामिनी पथकाची नियुक्ती केली आहे. ७ ते १३ ऑक्टोंबर दरम्यान (Hingoli Police) महिला पोलीस निरीक्षक शालिनी नाईक, पोलीस महिला अंमलदार आरती साळवे, अर्चना नखाते, पोलीस अंमलदार चंद्रशेखर देशमुख, चिलगर यांच्या पथकाने अनेक ठिकाणी भेटी देऊन ३९ टवाळखोंरावर कारवाई केली. तसेच गर्दीमधील हरविलेल्या ६ मुलांमुलींचा शोध घेऊन नातेवाईकांच्या स्वाधीन केले.