पांढरकवडा (Yawatmal) :- येथील कृषी उत्पन्न बाजार (Agricultural produce market) समितीची यंदाची निवडणुक अतिशय चुरसीची झाली होती. या निवडणुकीमध्ये मतदारांना आपल्या बाजुने ओढण्याकरीता साम, दाम, दंड, भेद या युक्तीचा वापर करण्यात आला होता. निवडणुकीमध्ये मतदारां प्रमाणे गावखेड्यातील नेत्यांना सुध्दा रोखे पोहचविण्यात आले होते. मात्र रोखे घेवुन सुध्दा बेईमानी करणार्यावर आता वसुलीची टांगती तलवार लटकत असल्याची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगत आहे. पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीची यंदाची निवडणुक अतिशय चुरसीची झाली होती.
निवडणुकीमध्ये पहिल्या दिवशी पासुनच क्रॉस मतदान होणार असल्याचा अंदाज
या निवडणुकीमध्ये कधी नव्हे ऐवढ्या मोठ्या प्रमाणात दोन्ही प्रमुख गटांकडुन पैशाचा महापुर आणल्या गेला. निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे लढतीतील कॉग्रेस व भाजप या दोन्ही प्रमुख पक्षामध्ये बंडखोरी झाली होती. तर निवडणुकीतील नामांकन अर्ज मागे घेण्याच्या वेळेस सुध्दा दोन्ही प्रमुख गटातील अनेक ईच्छुक नाराज झाले होते. त्या दोन्ही गटातील नाराज ईच्छुकांना हेरण्याकरीता दोन्ही गटाकडुन रोख्यांचा वापर करण्यात आला होता. अगदी १ लाखापासुन तर ५ लाख रुपये पर्यतचे रोखे संबधितांकडे पोहचते करण्यात आले होते. मात्र त्यातील अनेकांनी रोखे घेवुनही बेईमानी केल्याने अशा अशांची नावे आता उघड होवु लागली आहे. या निवडणुकीमध्ये पहिल्या दिवशी पासुनच क्रॉस मतदान होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यात लाखो रुपयांच्या रोख्यांची देवाण,घेवाण झाल्याने क्रॉस मतदान तर जास्तच होणार होते. मतमोजणीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात क्रॉस मतदान (Cross voting) झाल्याचेही दिसुन आले. पण क्षमतेपेक्षा जास्त रोखे घेवुनही काहींनी पाहिजे तशी मते मिळवुन दिलेली नसल्याने अशांकडुन आता त्या रोख्यांची वसुली करण्याची मोहिम काहींनी सुरु केल्याची चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे. यामध्ये नागा, सुरेश, व्यंकट, मल्ला आदिंवर वसुलीची टागंती तलवार लटकत असल्याचीही चर्चा सुरु आहे.
यामध्ये सर्वाधीक रोखे घेणार्या व्यंकट चे नाव डंक्यावर दिसत आहे. रोखे देणार्यांचे संबधितास मोबाईल कॉल गेलेले आहे. ठरलेल्या दिवशी रोखे परत न पोहचविल्यास रोखे घेणार्यांच्या घरी, रोखे देणार्यांचा जथ्था धडकणार असल्याची चांगलीच चर्चा सद्या तालुक्यात सुरु आहे.