मानोरा (Manora) :- मानोरा तालुका विज्युक्टा कार्यकारणीद्वारे तहसीलदार डॉ. संतोष यावलीकर यांना आपल्या न्याय्य, आश्वासित व रास्त मागण्याचे निवेदन दि. १७ मार्च रोजी कनिष्ठ महाविद्यालयीन (Junior College) शिक्षक महासंघ व विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन(Vidarbha Junior College Teachers Association) यांच्या संयुक्त आंदोलन सूचीप्रमाणे देण्यात आले.
विविध मागण्यांचा पाठपुरावा व काही नविन मागण्यांचा समावेश सादर
त्यामध्ये विविध मागण्यांचा पाठपुरावा व काही नविन मागण्यांचा समावेश सादर केला आहे. त्यात प्रामुख्याने प्रचलीत अनुदान सूत्रानुसार अनुदान देण्यात यावे. जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात यावा किंबहूना नवीन पद्धती द्वारे देऊ केलेल्या एनपीएस धारकांना जाचक अटीतून मुक्त करावे. सरसकट निवड श्रेणी देण्यात यावी. 10, 20, 30 या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा. केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन अकरावीचे प्रवेश सरसकट बंद करावेत. तुकड्यांना त्वरित अनुदान देण्यात यावे. माननीय शिक्षण मंत्र्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून, मीटिंग लावून त्यांचे म्हणणे ऐकून तरी घेण्यात यावे म्हणजे सांसदीय व संविधान पद्धतीचा वापर करण्यात यावा, ही सुद्धा एक मागणी त्यामध्ये आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माननीय मंत्रीमहोदय वेळ सुद्धा देत नाही ही शोकांतिका आहे, वरील सर्व मागण्यांचे एकत्रित निवेदन माननीय तहसीलदार यांना देण्यात आले.
प्रसंगी त्यामध्ये मानोरा तालुका विज्युक्टा अध्यक्ष प्रा. विवेक डबले, जिल्हा कार्यकारी सदस्य प्रा. अनिल वाघमारे, प्रा.संजय हांडे, प्रा. दिलीप वानखडे, प्रा. विलास गांजरे, प्रा.सुनिल काळे, प्रा. पंकज राऊत, प्रा. समंती दर्यापूरकर, प्रा.विजय भगत, प्रा. ढोले, प्रा.कु.भलामी, प्रा.आशीष, सचिन सोनोने व इतर बरेच ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन तालुका मानोऱ्याचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते