नांदेड (MP Ashok Chavan) : नांदेड शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बाबतीत बोलतांना म्हणाले होते की, 12 फेब्रुवारी 2024 ला नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्याला दुसऱ्यादा स्वातंत्र मिळाल अस वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्यावर अशोकराव चव्हाण (MP Ashok Chavan) यांनी आज पत्रकार परिषदेत उत्तर देताना म्हणाले की,ज्यांना काही राजकारणाची उंची नाही स्वत: प्रदेश पातळीवरील नेते समजतात त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करणे हे त्यांना नशोभणारी बाब आहे. मी सुद्धा ऐकेकाळी राज्याचा प्रदेश अध्यक्ष होतो. मी आमची वैचारीक उंची कधीही खाली जाऊनदेता वैचारीक पातळी साभांळी त्यांची वक्तव्य ही व्यक्तीगत द्वेषातुन केलेली आहेत. त्यांनी काल केलेल वक्तव्य हे स्वातंत्र्य लढ्यातील बलिदानाचा हा अपमान आहे.