प्रादेशिक परिवहन विभागाची विशेष तपासणी मोहीम
नांदगाव पेठ (Regional Transport Department) : रतन इंडिया औष्णिक उर्जा वीज प्रकल्पातून राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनांची मंगळवारी सकाळी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तसेच ओव्हरलोड असणाऱ्या ११ वाहनांना ६ लाख १० हजाराचा दंड (Regional Transport Department) प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ठोठाविण्यात आला.
गेल्या दोन दिवसापासून विशेष तपासणी मोहीम अंतर्गत रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पातून निघणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात आली. यामध्ये राखेची वाहतूक करणारे अकरा बलकर वाहनावर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये कार्यवाही करण्यात येऊन त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. माध्यमांनी या प्रकाराला समोर आणल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा धडाका सुरू केला होता.
प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निरीक्षक प्रताप राऊत, प्रमोद सरोदे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शिवप्रसाद मवाळ, राहुल मुडे, कृष्णा नेवरे, वाहन चालक मोहम्मद अतहर, रितेश मेश्राम व अमोल गावनेर यांनी ही कार्यवाही केली.