अर्जुनी मोर (Gondia):- तालुक्यातल्या नवेगाव बांध येथील पोलीस निरीक्षक योगिता चाफले यांनी आपल्या आईच्या स्मृतिप्रतीर्थ येरंडी/ तिडका मागास क्षेत्राच्या गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणात भर घातली. एवढेच नाहीतर त्यांनी या गावाला दत्तक घेऊन गावातील विविध समस्या ओळखून त्यांची पूर्तता केली.
खंडविकास अधिकारी व गावकऱ्याकडून ठाणेदाराचे अभिनंदन
गावात शिक्षणा साठी शाळा आहे मात्र, या शाळेची दैनीअवस्था असल्याने नवेगाव बाध च्या ठाणेदार योगिता चाफले यांनी शाळा मदतीसाठी शाळा वर्ग खोलीला दुरुस्त करून त्या वर्गखोलीत स्टाईल लावून व रंगरंगोटी करून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुसज्ज अशी व्यवस्था करून दिली. शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तका व साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणात भर घातली. कर्तव्यदक्ष ठाणेदार यांचे येरंडी येथील गावकऱ्यांनी अभिमान व्यक्त करून स्वागत केले. त्याचप्रमाणे या कार्याची जाण ठेवून ठाणेदार त्या गावाला वारंवार भीटी देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतात.
विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप
सदर ठाणेदार यांनी दिनांक 18/07 / 2024 ला जिल्हा परिषद (Zilla Parishad) प्राथमिक शाळा येरंडी /तितका विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप केले. याप्रसंगी शाळेला सदिच्छा भेट म्हणून व अर्जुनी मोर येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर वैद्य, तसेच अंगणवाडी अधिकारी उपरीकर, बांधकाम विभागाची कर्मचारी संजय शाहारे यांनी या प्रसंगी दिली. नवेगाव बाद चे थानेदार योगिता चापली यांनी आपल्या मातृ स्मृतिप्रित्यर्थ वर्गखोलीदुरुस्ती करून रंगरंगोटी व शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण उपयोगी साहित्य वाटप (Distribution of materials) केल्याने ठाणेदाराचे कार्य पाहून गावकऱ्यांनी तसेच अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले याप्रसंगी येरंडी /तिडका येथील माझी पोलीस पाटील व अंगणवाडी सेविका (Anganwadi worker) त्याचप्रमाणे सरपंच करण रक्षा, शाळेची शिक्षक मुख्याध्यापक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.