हिंगोली (Hingoli Water supply) : हिंगोली ते वाशिम रस्त्यावर नविन सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. लाला लजपतराय नगर परिसरात नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाची मुख्य जलवाहीनी स्थलांतरीत व दूरूस्तीच्या कामासाठी ७ फेबु्रवारी ला शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली (Hingoli Water supply) पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने जलवाहीनी स्थलांतरीत व दूरूस्तीचे काम केल्यानंतर शुक्रवारी रात्री पाणी पुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे. आज ८ फेबुव्रारीला रोटेशन पध्दतीने पाणी पुरवठा सोडला जाणार आहे.