बारव्हा (भंडारा/Bhandara):- लाखांदूर तालुक्यातील दिघोरी वन परिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या पारडी येथील विजय ताराम यांच्या शेत जमिनीतील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागमार्फत(Forest Department) रेस्क्यू केल्याची घटना दि.१९ मे रोजी दुपारी ३ वाजे दरम्यान एनएनटीआर पथक तथा आरआरटी (RRT) वन विभागाच्या पथकाने रेस्क्यु केल्याची माहिती पारडी येथील नागरिकाकडून मिळाली आहे.
वनातील प्राणी हे पाण्याच्या शोधात गावाकडे रात्रीच्या दरम्यान आगेकूच करीत
लाखांदूर तालुक्यातील पारडी येथील रहिवाशी विजय ताराम यांचे घर शेतशिवारात आहे. तिथे पाण्याची सोय म्हणून विहरीचे बांधकाम (Construction) करण्यात आले आहे. घर व शेतशिवारा पासून जंगल सुरु होत असल्याने वनातील प्राणी हे पाण्याच्या शोधात गावाकडे रात्रीच्या दरम्यान आगेकूच करीत असतात. अशातच दि.१८ रोजी पहाटे किंवा रात्रीच्या दरम्यान जंगलातून (Forest) पाण्याच्या अथवा शिकारीच्या शोधात बिबट आला असावा. मात्र विहीरीला तोंडी नसल्याने सरळ बिबट (Leopard) हा विहरीत पडला असावा. दि.१९ मे रोजी सकाळी घरातील महिला विहिरीतील पाणी काढण्यासाठी गेले असता. विहरीत बिबट पडला असल्याचे लक्षात आले. याची माहिती वनपरिक्षेत्र (Forest area) अधिकारी लाखांदूर व वनरक्षक लाखांदूर यांना देण्यात आली. लगेच वन अधिकारी, एनएनटीआर पथक व आरआरटी पथक घटनास्थळी दाखल होऊन रेस्क्यू केले. बिबट्याला विहरीतून सुखरूप जिवंत काढले. यावेळी वनविभागातील वरिष्ठ अधिकारी व वन कर्मचारी उपस्थित होते. या दरम्यान बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्याने गर्दी केली होती.