Vice Chancellor :- आज समाजाला संशोधनाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःमधील बलस्थाने ओळखून समाजाभिमुख संशोधन करावे, असे मत प्रोफेसर डॉ. दिलीप उके यांनी व्यक्त केले. अशोका शिक्षण संस्थेच्या “स्टुडन्ट रिसर्च प्रोजेक्ट कॉम्पिटिशन”च्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते.
महाविद्यालयांतर्फे गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वृद्धिंगत व्हावी
संस्थे अंतर्गत असणाऱ्या चारही महाविद्यालयांतर्फे (College) गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वृद्धिंगत व्हावी. या हेतूने संशोधनावर आधारित स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना समाजातील विविध ज्वलंत समस्या डोळ्यासमोर ठेवून समाज हितासाठी संशोधनास प्रवृत्त केले गेले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा राणे नगर येथील अशोका बिझनेस स्कुल या एमबीए महाविद्यालयात संपन्न झाला. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा मुंबई (Mumbai) विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप उके आणि सन्माननीय पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य यांची उपस्थिती लाभली होती. या स्पर्धेत चारही महाविद्यालये मिळून एकूण एकशे एक्केचाळीस संशोधन पत्र सादर करण्यात आले. या संशोधनातून विद्यार्थांमध्ये सामाजिक कर्तव्य(Duty), तार्किक विचारशैली (logical thinking style), संशोधन वृत्ती अशा विविध कौशल्यांचा विकास होण्यास मदत झाली.
माणुसकी हा एकच धर्म माणुन एका ध्येया ने काम केले तर राष्ट्र उन्नत होईल
आपल्या भाषणातून डॉ. दिलीप उके यांनी अशोकातर्फे सुरु करण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण तसेच संशोधनाभिमुख उपक्रमाचे कौतुक करतानाच भावी शास्त्रज्ञ येथून नक्की घडतील अशी आशा व्यक्त केली. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार असून SMART या शब्दाचा खरा अर्थ जाणून स्वतः मधील गुणांची पारख करून संशोधन करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. अभ्यासक्रम व्यतिरिक्त पण अभ्यास पूरक असा हा नावीन्य पूर्ण उपक्रम असल्याने त्याचे त्यांनी कौतुक केले. तसेच आजादीचा अमृतमहोत्सव साजरा होत असतांना जाती भेद, वर्ण भेद दुर करून राष्ट्राच्या प्रगती साठी माणुसकी हा एकच धर्म माणुन एका ध्येया ने काम केले तर राष्ट्र उन्नत होईल. नैतिकमूल्ये ओळखून आपण आपले कर्तव्य निभावले पाहिजे. मी, माझे न करता आदर भावनेने राष्ट्र हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी काम करावे असे मत डॉ.दिलीप उके यांनी व्यक्त केले. संशोधन करून सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे,येणाऱ्या काळात संशोधन हाच सर्व प्रगतीचा पाया असल्याचे सागर वैद्य यांनी नमूद केले. डॉ. डी. एम. गुजराथी ज्यांनी या स्पर्धेची आखणी केली त्यांनी या स्पर्धे दरम्यान होणारे संशोधन आणि सातत्य या विषयी समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
स्पर्धेत अशोका बिझनेस स्कुल मधून जान्हवी पंजाबी हिने प्रथम पारितोषिक पटकावले
अशोका संस्थेचे सचिव श्री. श्रीकांत शुक्ल यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचे अभिनंदन करून भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन संशोधन करावे अशी आशा व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ.अशोक कटारीया आणि व्यवस्थापकिय विश्वस्त सौ. आस्था कटारीया यांनी सर्व विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून डॉ.गणेश तेलतुंबडे व डॉ.स्वप्ना पाटील यांनी काम पाहिले. अशोका च्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापक या वेळी उपस्थित होते. स्पर्धेत अशोका बिझनेस स्कुल मधून जान्हवी पंजाबी हिने प्रथम पारितोषिक पटकावले. अशोकासेंटर फॉर बिझनेस अँड कॉम्पुटर स्टडी महाविद्यालयातुन स्नेहा पप्नेजा, प्रज्वल सोनवणे, हिरल पंड्या यांनी प्रथम तर अशोका संलग्न बी एस सी बीएड महाविद्यालयातुन मेहेक तांबोळी हिने प्रथम पारितोषिक पटकावले. अशोका बी ए बीएड महाविद्यालयातून अदिती सिंग व ध्वनी छाबीया या विद्यार्थीनीनी प्रथम आणि अशोका इंटरनॅशनल सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडी अँड रिसर्च महाविद्यालयातून दिक्षा नागदेव ही प्रथम आली .
या स्पर्धेचे समन्वयन डॉ. सरिता ढवळे यांनी केले. त्यांना चारही महाविद्यालयातील डॉ. प्रीती सोनार, डॉ. मनीषा शिरसाठ, डॉ. हर्षा पाटील,डॉ.आशा ठोके व डॉ. रेखा पाटील यांचे सहकार्य लाभले. कु. अनिशा बिर्ला आणि कु.ख्रिस्तीना पेड्डी या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले. पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन डॉ. प्रीती सोनार यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. परमेश्वर बिरादार यांनी मानले. या स्पर्धेमुळे संशोधना बाबत आवड निर्माण झाली अशी भावना सर्व स्पर्धंकांनी व्यक्त केली.