मानोरा (Washim) :- तालुक्यातील सन २०२५ ते २०३० दरम्यान सार्वत्रिक निवडणूक द्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायत (gram panchayat) सरपंच पदाकरिता आरक्षण सोडत २१ एप्रिल रोजी काढण्यात आली. मानोरा तहसीलच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार संतोष येवली कर, निवडणूक नायब तहसीलदार सतीश काळे, मधुकर अष्टुरे यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढून ग्राम पंचायत निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले.
ग्रामीण राजकारण तापणार..!
ग्रामपंचायत निवडणुकीला स्थानिक पातळीवर महत्त्व असल्याने सन २०२५ ते २०३० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूका लक्षात घेता जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत सरपंच पदाकरिता ही आरक्षण सोडत काढण्यात आली. गाव पातळीवरील ग्रामपंचायत सरपंच पद हे अतिशय महत्त्वाचे असल्याने या आरक्षण सोडतीकडे मानोरा तालुक्यातील गाव पातळीवरील राजकारणाचे लक्ष लागले होते. ग्रामपंचायत नुसार सरपंच पदाचे आरक्षण यामध्ये अनुसूचित जाती वापटा, सोयजना, हिवरा खुर्द, धोनी, भुली, अनुसूचित जाती स्त्री पारवा , फुलउमरी, वाईगोळ, आसोला खुर्द, पालोदी, अनुसूचित जमाती तोरनाला, दापुरा बु, धानोरा बु, सिंगडोह हळदा, माहुली, अनुसूचित जमाती स्त्री कुपटा , सोमनाथनगर, खापरदरी, हातना, पोहरादेवी, नागरिकांचा मागास प्रवर्ग रुद्राला , रोहना, हिवरा बु, अभयखेडा, कोलार, वटफळ, उमरी बु, गोंडेगाव, नामाप्र महीला सेवादासनगर, गिरडा, कारपा, आमदरी , रतनवाडी, शेंदोना, सावळी, तलप बु, एकलारा, सर्वसाधारण अंजनी , दापुरा खुर्द , भोयणी, चौसला , चोंडी, धामणी, बोरव्हा , कारखेडा, वरोली, देवठाणा , आमगव्हाण, कोडोली , सोमठाणा, साखरडोह , खांबाला, गोष्टा, रुई , धावंडा, सर्वसाधारण स्त्री इंझोरी , जामदारा घोटी, म्हसणी, मोहगव्हाण, जणूना खुर्द, आसोला बु, कारली, देऊरवाडी, पंचाला, गादेगाव, गव्हा, विठोली, गिरोली, भिलडोंगर , शेंदुरजना आढाव, मेंद्रा, हातोली, सोमेश्वरनगर, वसंतनगर पोहरादेवी, आमकिन्ही, आसोला खुर्द, पालोदि, तलप बु आणि एकलारा या गावांचा समावेश आहे. तालुक्यात ७७ ग्रामपचायती पैकी ३७ ग्राम पंचायतीत महिला आरक्षण निघाल्याने मानोरा तालुक्यातील ओबीसी महिला आरक्षण कमी दिसत असल्याची चर्चा ऐकावयास मिळाली. यावेळी ईश्वर चिठ्ठीद्वारे चार ग्राम पंचायतचे आरक्षण काढण्यात आले.
