परभणी/सेलू (Parbhani):- शहरातील सामाजिक कार्यकर्ते अँड. विष्णु ढोले यांनी गुरुवार ४ जुलै पासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या स्मारक परिसरात मुस्लिम समाजाच्या(Muslim community) न्याय मागण्यासाठी आमरण उपोषण सुरु केले आहे. आज शुक्रवार ५जुलै उपोषणाचा दुसरा दिवस आहे. उपोषणा संदर्भातील मागण्या याप्रमाणे मुस्लिम समाजाला सर्वच क्षेत्रांमध्ये 10 % आरक्षण देण्यात मावे, मुस्लिम समाजाला पुर्ण आरक्षण मिळेपर्यंत अंतरीम रित्या जुलै २०१४ मध्ये तत्कालीन आघाडी शासनाने अध्यादेशाद्वारे मुस्लिम समाजास दिलेले ५% आरक्षण जे शैक्षणिक क्षेत्रात माननिय उच्च न्यायालयाने मान्य केले होते ते आरक्षण पुर्नस्थापित करण्यात यावे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आमरण उपोषणास बसले
महाज्योती, सारथी, बार्टिच्या धर्तीवर मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी मार्टिची ( मौलाना आझाद रिसर्च & ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ) या स्वातंत्र्य संस्थेची स्थापना करण्यात यावी, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळे पर्यंत या समाजातील विद्यार्थ्यांना उच्च व तंत्रशिक्षण तसेच वैद्यकीय व इतर व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक फी (Educational Fees) मध्ये ५०% सवलत अर्थात शिष्यवृत्ती योजना सुरु करावी, मागासवर्गीय सहकारी संस्थांच्या धर्तीवर अल्पसंख्याक सहकारी संस्था स्थापन व नोंदणीसाठी कायदा करण्यात यावा, प्रत्येक तालूक्याच्या ठिकाणी उर्दु घर व मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक सभागृह (Cultural Hall) उभारण्यात यावे, न्यायमुर्ती रंगनाथ मिश्रा आयोग, सच्चर समिती, महेमुद -ऊर्ररहेमान समीती या तिन्ही समितीने मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते अँड .विष्णू ढोले हे स्टेशन रोडवर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आमरण उपोषणास बसले आहेत .
त्यांना भेटणाऱ्या मान्यवरांनी शुभेच्छा देत या उपोषणास पाठिंबा दर्शविला आहे.