हिंगोली (Jawan Suicide Case) : राज्य राखीव पोलिस बल गट क्र.१२ मधील जवान जी.एम. शहाणे यांनी राखीव दलाच्या निवासस्थानात बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, परभणी येथील रहिवाशी असलेले जवान जी.एम. शहाणे हे सन २००८ मध्ये हिंगोली येथील (Jawan Suicide Case) राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १२ मध्ये भरती झाले होते. सध्या ते प्रशासन कंपनीमध्ये कार्यरत होते. कुटूंबीयासह ते राज्य राखीव पोलिस बल गट क्र.१२ च्या शासकीय निवासस्थानात वास्तव्यास होते. पत्नी, बाहेरगावी गेली असल्याने ते एकटेच घरी होते. २२ जानेवारी बुधवारी रोजी पत्नीने त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नसल्याने तिने शेजारी असलेल्या कुटूंबीयास याबाबतची माहिती दिली.
शेजार्यांनी दरवाजा वाजवून आवाज दिला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी खिडकीतून पाहील्यानंतर जवान शहाणे (Jawan Suicide Case) यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्यासह अशोक धामणे, गणाजी पोटे, संतोष करे, धनंजय क्षिरसागर, एस.आर.पी.एफचे सहाय्यक समादेशक एस. एस. तिडके यांनीही घटनास्थळी भेट देऊन मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविला. या घटनेबाबत सिध्दार्थ शहाणे (Jawan Suicide Case) यांनी हिंगोली शहर पोलिसात दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.