गंगाखेड(Parbhani):- तालुक्यातील धारासुर येथील प्राचीन कालीन श्री गुप्तेश्वर मंदिर जतन संवर्धनाचे कामाला राज्य शासनाने मंजुरी देत मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी राज्य शासनाच्या(state government) सांस्कृतिक कार्य विभागाकडून (Department of Cultural Affairs) २८ कोटी ५८ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये मंदिराचे कळस उतरविण्याचे काम प्रगती पथावर असल्याचे दिसत आहे.
गंगाखेड तालुक्यातील धारासुर येथे गोदावरी नदी काठावर असलेल्या प्राचीन कालीन श्री गुप्तेश्वर मंदिराची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने प्राचीन कालीन या मंदिराचे जतन व संवर्धन करण्याच्या मागणी संदर्भात येथील ग्रामस्थांनी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडे रेटा लावल्याने मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी २८ कोटी ५८ लाख रुपये निधी उपलब्ध करून देत पहिल्या टप्प्यात १४ कोटी ७९ लाख ९५ हजार रुपयास वित्तीय मान्यता देऊन धारासुर येथील या प्राचीन कालीन श्री गुप्तेश्वर मंदिराचे जतन व संवर्धन करण्यासाठी मंदिर जिर्णोद्धाराचे (Temple restoration)काम सुरू करण्यात आले आहे.
श्री गुप्तेश्वर मंदिरावरील कोरीव दगड व शिळा तसेच कळस उतरविण्याचे काम हाती घेण्यात आले
श्री गुप्तेश्वर मंदिर जतन व संवर्धन जिर्णोद्धाराचे काम करतांना श्री गुप्तेश्वर मंदिरावरील कोरीव दगड व शिळा तसेच कळस उतरविण्याचे काम हाती घेण्यात आले असून हे काम प्रगती पथावर असल्याचे पहावयास मिळत आहे. मंदिरावरील कोरीव दगड तसेच शिळा उतरविताना या शिळांना तसेच दगडांना कोणतीही हानी पोहचू नये यासाठी मंदिराच्या चोहबाजूने व मंदिरातील आतील भागामध्ये मातीच्या गोण्या भरून लावण्यात आल्याचे दिसत असून पूर्ण शिखराला पीओपी करण्यात आली आहे. पुरातत्त्व विभागाच्या सुचनेप्रमाणे यापुढे श्री गुप्तेश्वर मंदिराचे शिखर उतरवून सभा मंडप, अंतराळ गर्भ ग्रहासह संपूर्ण मंदिर उतरविण्यात येणार असल्याचे मंदिराचे काम पाहणाऱ्या सवानी हॅरीटेजच्या कर्मचाऱ्याने दैनिक देशोन्नतीशी (Deshonnati)बोलताना सांगितले आहे.
मंदिर जिर्णोद्धाराचे काम तातडीने पूर्ण करावे
धारासुर येथील प्राचीन कालीन श्री गुप्तेश्वर मंदिर जिर्णोद्धाराचे काम सुरू करण्यात आले असून हे पूर्ण होण्यासाठी तब्बल तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे. मंदिराचे काम दिलेल्या मुदतीत लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी पुरातत्त्व विभागाने कामा संदर्भात वेळोवेळी तातडीने परवानगी देत काम बंद पडू नये याची काळजी घ्यावी व मंत्रालयातील (Ministry)सांस्कृतिक कार्य विभागाने तसेच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी याकडे जातीने लक्ष देत काम तातडीने पूर्ण करून घ्यावे अशी अपेक्षा धारासुर येथील ग्रामस्थांतून व्यक्त केल्या जात आहे.