महसूल दिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार
रिसोड (Revenue Day) : शासन आणि जनतेमधील दुवा म्हणजे महसूल प्रशासन असून, विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी आणि नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवणे हे आपले मुख्य कर्तव्य आहे असे अध्यक्षीय भाषणात (Tahsidar Tejankar) तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर म्हणाल्या.
रिसोड तहसील कार्यालयात 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन (Revenue Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी किशोर लहाने, प्रभारी दुय्यम निबंधक बालाजी मदने,नायब तहसीलदार गजानन जवादे, निवासी नायब तहसीलदार सुभाष जाधव, अन्नपुरवठा निरीक्षक गणेश तांगडे रिसोड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश मांदळे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर पडधान यांनी केले. त्यांनी (Revenue Day) महसूल प्रशासनाचे कार्य, जबाबदाऱ्या व त्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्ष भाषणात तहसीलदार तेजनकर पुढे म्हणल्या की, शासनाचे विविध उपक्रम रिसोड तालुक्यात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आपण जिल्ह्यात अव्वल काम करू शकलो यामध्ये 140% महसूल वसूल करणे ,ॲग्री स्टॅग चे काम 115 टक्के करणे, शासनाचा महत्त्वकांक्षी जलतारा उपक्रम तालुक्यात यशस्वी राबविणे , पांदण रस्ते खुले करणे , पिक पेरा, विविध दाखल्याचे वाटप करणे, पुरवठा विभागाचे अद्यावत काम तसेच शासनाने मागितलेली माहिती वेळेच्या आत पोहोचणे यासारखे विविध कामे सर्वांच्या मदतीने शक्य झालेले आपण जिल्ह्यात चांगली कामगिरी करू शकलो.
महसूल विभागात (Revenue Day) उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कर्मचारी आणि महसूल सेवकांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन तलाठी धनंजय काष्टे यांनी तर आभार प्रदर्शन गजानन गरकळ यांनी केले. या कार्यक्रमाला तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक तसेच शहरातील नागरिक, पत्रकार व समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.