देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली बुलढाणा (Revenue Department) : महसूल विभागात काम करणारे मंडळ अधिकारी यांना शासन पदोन्नती पासून वंचित ठेवत आहेत तसेच दरमहा वेतन मिळत नाही. अशा विविध मागण्या संदर्भात चिखली तालुक्यातील ११ मंडळ अधिकारी यांनी (Tehsil Office) चिखली तहसील कार्यालयासमोर ९ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन सुरू केले.
निवेदनात नमूद केले आहे की, चिखली तालुक्यांत ११ मंडळ अधिकारी हे नियमित महसूल विभागात (Revenue Department) काम करतात. मात्र या कर्मचाऱ्यांना मागील दोन वर्षांपासून नियमित वेतन मिळत नाही. शासनाच्या धोरणानुसार दरमहा ५ तारखेला वेतन मिळणे आवश्यक आहे परंतु वेळेवर वेतन दिल्या जात नाही काही वेळा वेतन जमा होवूनही उशिरा वेतन दिल्या जाते. तसेच (Tehsil Office) नायब तहसीलदार संवर्गामध्ये होणाऱ्या पदोन्नती साठी मंडळ अधिकारी व अव्वल कारकून यांचे पदसंख्येचा आढावा घेवून मंडळ अधिकारी व अव्वल कारकून पदोन्नतीचे प्रमाण त्वरित निश्चित करावे , जेणे करून एकीकडे महसूल विभागात (Revenue Department) लिपिक पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती केली जाते मात्र मंडळ अधिकारी यांची पदोन्नती केली जात नाही.
त्यामुळे या (Revenue Department) कर्मचाऱ्यांना निवृत्ती होतांना मंडळ अधिकारी याच पदावर सेवानिवृत्त व्हावे लागत आहे हा अन्याय शासन करत असल्याने मंडळ अधिकारी यांनी धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जर मागण्या मान्य न झाल्यास दिनांक १२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा, १३ सप्टेंबर रोजी आयुक्त कार्यालय अमरावती, आणि १७ सप्टेंबर रोजी सर्व मंडळ अधिकारी यांच्याकडील असलेली डी एस सी तहसिलदार यांचेकडे जमा करून सामूहिक रजा आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष ए टी शेळके, उपाध्यक्ष संजय सरांगे, एन एच सोनुने, ए पी सुरडकर, एस एस चौधरी, एस बी झीने, जी बी जाधव, के बी मोरे, ए के चवरे, बी एन पवार, हे धरणे आंदोलनात सहभागी झाले आहे.