मांगवाडी ते आगरवाडी रस्त्याने घेतला मोकळा श्वास..!
नववर्षातील महसुल विभागाचा विधायक उपक्रम
रिसोड (Revenue Department ) : तालुक्यातील पांदण रस्ते मोकळे करण्या संदर्भात जिल्हाधिकारी वाशिम श्रीमती. बुवेनेश्वरी एस यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी, तलाठी, महसुल कारकुण यांनी स्थानिक प्रशासणाच्या सहकार्य अनेक पांदण रस्त्याचे काम मार्गी लावले,महसुल प्रशासणाने नववर्षाचे स्वागत तालुक्यातील मागील पन्नास वर्षापासुन प्रलंबित पडलेला मांगवाडी ते आगरवाडी हा तीन किलो मीटरचा पांदण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावुन शेतक-यांना नववर्षाची एक प्रकारे भेट दिली आहे.
तालुक्यातील मांगवाडी ते आगरवाडी हा अंदाजे तीन किमीचा पांदण रस्ता मागील पंन्नास वर्षा पासुन अतिक्रमणात आडकलेला होता.या पांदण रस्त्या अभावी सुमारे चाळीस शेतक-यांना शेतातील उत्पन्न योग्यवेळी बाजार पेठेत घेऊन जाण्यास मोठा त्रास होत होता. हा प्रश्न मागील पन्नास वर्षांपासुन प्रलंबित आसतांनी याकडे कोणाचेच लक्ष वेधल्या जात नव्हते.तहसीलदार प्रतिक्षा तेजणकर यांच्याकडे हा विषय (Revenue Department) महसुल मंडळाधिकारी समाधान जावळे,तलाठी राजेंद्र जाधव यांनी शेतक-यांची परवड सांगीतले.
यावर तहसीलदार तेजनकर यांनी या पांदणरस्त्यावर लक्ष केंद्रित करीत ता.1 जानेवारी या नववर्षाच्या पहील्या दिवशी सुमारे चाळीस शेतक-यांना पांदरण रस्त्याचे महत्व पटवुन देत मंडळाधिकारी,तलाठी सरपंच विनोद वाळके,प्रतिष्ठित नागरिक श्रीराम वाळके, विजय पौळ, शिवाजी पौळ, संजय पौळ,राजाराम पौळ,नामदेव जाधव,नामदेव बोरूडे यांच्यासह इतर शेतक-यांना सोबत घेत सुमारे 11 फुट रूंदी आणि 3 किमी अंतराचा मांगवाडी ते आगरवाडी पांदण रस्ता चुणा आखुन मोकळा करून दिला.या सामुहिक कार्याने शेतकरी सुखावला आसुन तालुक्यातील इतरही पांदण रस्ते लवकरच मोकाळाश्वास घेण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
– प्रतिक्षा तेजनकर (तहसीलदार रिसोड)
महसुल प्रशासणाच्या (Revenue Department) सहकार्याने नववर्षाचे स्वागत मांगवाडी ते आगरवाडी या तीन किमी.व अकरा फुट रूंदी पांदण रस्त्याने केले आहे.तालुक्यातील पांदरणरस्त्यांचे महत्व महसुल विभाग शेतक-यांना पटवुन देत आसुन धु-यावरील वाद हा धु-यावर मिटविण्यास प्राधान्य दिल्या जात आहे.