धामणगाव रेल्वे (Revenue Department) : अवैध गौण खनिज (Illegal mineral) वाहतुकीवरून कारवाई दरम्यान महसूल पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर चढवुन धक्काबुक्की केल्याची घटना तालुक्यातील मौजा शहापूर हद्दीत घडली. तलाठी गोपाल नागरीकर यांच्या तक्रारीवरून (Dattapur police) दत्तापुर पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी शहापुर येथे अवैध मुरुमाचे उत्खनन होत असल्याची गोपनीय माहिती (Revenue Department) महसूल विभागाला मिळाली.
महसूल पथकावर चढवला ट्रॅक्टर
तहसिलदार गोविंद वाकडे यांच्या आदेशाने महसूल पथकातील जुना धामणगाव मंडळ अधिकारी राजेश लाड,तलाठी गोपाल नागरिकर, अनंत मानकर तसेच कोतवाल रवी घाटे मौजा शहापुर येथे पाहणी केली असता ट्रक्टर एमएच २७ डीएल ४४३९ क्रमांकाचा ट्रक्टर विना परवाना मुरुमाचे उत्खनन करून मुरूम चोरी करतांना आढळून आला. सदर ट्रक्टर चालकाचे नाव निरंजन संभाजी उईके तर ट्रक्टर मालक राहुल राजहंस गावंडे व अतुल राजहंस गावंडे हे दोघे असल्याचे त्याने सांगितले. (Revenue Department) महसूल पथकाने पुढील कारवाईसाठी चालकाला चोरीच्या १ ब्रास मुरुमासह ट्रक्टर तहसील कार्यालयात घेवून जाण्यासाठी सांगितले असता ट्रॅक्टर मालक राहुल व अतुल गावंडे हे घटनास्थळी आले.
हुज्जतबाजी, शासकीय कामात अडथळा
राहुल स्वतः ट्रॅक्टरवर बसला व जबरदस्तीने ट्रॅक्टर घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. (Talathi nagarikar) तलाठी नागरिकर यांनी ट्रॅक्टरवर चढून अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांने धक्काबुक्की करून खाली लोटले. जर बाजुला झाले नाही तर तुमच्या अंगावर टॅक्टर आनुन जीवे मारण्याची धमकी देऊन तलाठी गोपाल नागरिकर, मंडळ अधिकारी राजेश लाड, अनंत मानकर यांचे अंगावर ट्रॅक्टर आनला असता हे थोडक्यात बचावले. तिघांनीही ट्रॅक्टर मधील भरलेले अंदाजे दोन हजार किंमतीचे १ ब्रास मुरूम तेथेच खाली करुन तिघेही पळून गेले.
दत्तापुर पोलिसात गुन्हा दाखल
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तहसीलदार गोविंद वाकडे यांच्या आदेशाने तलाठी नागरिकर यांनी दत्तापुर पोलिसात तक्रार नोंदवली आहे. दरम्यान (Dattapur police) दत्तापुर पोलिसांनी ट्रॅक्टर मालक राहुल राजहंस गावंडे त्याचा भाऊ अतुल राजहंस गावंडे व चालक निरंजन संभाजी उईके सर्व रा.शहापूर जुना धामणगाव यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण करून जीवे मारण्याचा पर्यंत व (Illegal mineral) गौण खनिज चोरीच्या कलम ३५३,३७९,३०७,५०४ अधिक ३४ अनव्य गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास दत्तापुर पोलीस करीत आहे.