नांदेड(Nanded):- महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने विविध मागण्यासाठी १५ जुलै पासून बेमुदत संप पुकारले आहे. त्यामुळे महसुलचे कामकाज ठप्प पडले आहे.
या संपाला महाराष्ट्र राज्य तहसिलदार (Maharashtra State Tehsildar) व नायब तहसिलदार संघटनेच्या वतीने पाठींबा देण्यात आला आहे. नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना ग्रेड पे (grade pay) ४ हजार ८०० रूपये देण्यात यावी अशी मागणी शासकडे करण्यात आली आहे. सोमवारी नायब तहसिलदार संघटनेच्या अध्यक्ष मुगाजी काकडे आणि सचिव संजय नागमवाड यांनी पाठींब्याचे पत्र महसूल कर्मचारी संघटनेचे (Customs Employees Association) कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमवार व जिल्हाध्यक्ष गिरीश येवते यांना दिले आहे.