नांदेड(Nanded) :- राज्यातील महसूल कर्मचारी (Revenue Officer) १५ जुलै पासून बेमुद्दत संप करीत आहेत. शुक्रवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचाऱ्यांनी निदर्शेने केली आहेत. सरकार नोकरभरती काढत नाही. त्यामुळे महसूलच्या एका कर्मचाऱ्याला चार ते पाच विभागाचे कामे करावी लागत असल्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर पुर्ण होत नाहीत त्यामुळे नागरिक महसूल कर्मचाऱ्यावर रोष व्यक्त करतात.
संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने नोकर भरती करावी
यामुळे महसूल विभागाचा आकृतीबंद लवकरात लवकर काढावे, विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने नोकर भरती करावी आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडव्यात अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा आगामी विधानसभेत सरकारला महसूल कर्मचाऱ्याचा फटका बसेल असा इशारा महाराष्ट्र राज्य (State of Maharashtra)महसूल कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमवार यांनी दिला आहे.