चिखली (Buldhana):- महसूल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या संदर्भात १३ जुलै पासून तर २२ जुलै पर्यत काम बंद आंदोलन केले होते. त्या दरमानच्या दिवसामध्ये निराधार, सुशिक्षित बेरोजगार, विद्यार्थ्यां आणि मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना (Laadki Bahin Yojna)अशा विविध योजनेच्या लाभासाठी नागरिकांची तहसिल कार्यालयात(tehsil office) मोठी गर्दी वाढलेली होती. अशा गरजवंत लोकांची धावपळ पाहून एजंट हे आथिर्क लूट करू लागले. परंतु अशा स्थितीत या गरजू लोकांसाठी धावून येणारे अधिकारी महसूल प्रशासनात कार्यरत असलेले नायब तहसीलदार वीर आणि खाडे यांनी प्रशासकिय कामकाजा व्यतीरिक्त सामाजिक बांधिलकी जोपासत महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाच्या काळात हजारो दाखले केले लोकांना वितरीत केले.
चिखली नायब तहसीलदारांनी हजारो दाखले केले वितरीत
चिखली तहसील कार्यालया अंतर्गत दिडशे गावाचा समावेश असल्याने तहसिलदार संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयांत जनतेला तत्पर सेवा देण्यासाठी चार नायब तहसीलदार कार्यरत आहेत. त्यांमध्ये महत्वाचे खाते म्हणजे संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojna) आणि विविध दाखले, प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी निवासी नायब तहसीलदार वीर आणि खाडे हे कर्तव्य पार पाडत आहेत. मागील तीन वर्षाच्या प्रशासकिय कालावधीत या दोन्ही नायब तहसीलदारांनी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी कार्यालयात वेळेवर येणे, टेबलवर ठेवलेल्या कागदपत्रांचा तत्काळ निपटारा करणे, आणि योजनेचे काम घेवून येणाऱ्या गरजवंतांचे योग्य प्रकारे समाधान करणे, यामुळेच चिखली तहसील कार्यालयात नागरिकांना त्रास सहन करण्याची वेळ येत नसे. त्यातच अचानक महसूल कर्मचाऱ्यांनी(revenue staff) १३ जुलै पासून तर २२ जुलै पर्यत बेमुदत संप पुकारला होता. आणि शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना सुरू केली.
महसूल कर्मचाऱ्यांनी १३ जुलै पासून तर २२ जुलै पर्यत बेमुदत संप पुकारला
त्याच बरोबर विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेवू लागले होते . मात्र महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरीकांना तहसील कार्यालयातून दाखले मिळणार नाही याची भीती निर्माण झाली होती. परंतु नायब तहसीलदार वीर आणि खाडे यांनी कार्यालयीन वेळेपेक्षा जास्त वेळ देवून लोकांची कामे मार्गी लावली त्यामध्ये निराधार योजनेच्या लोकांना लागणारे कागदपत्रे तसेच लाडकी योजना, शाळा कॉलेज(school college), आदी कामांसाठी लागणारे दाखले, प्रमाणपत्र(certificate), तात्काळ एकाच दिवशी वितरीत करूण लोकांना मोठा दिलासा दिला. त्यामुळे तहसिलदार संतोष काकडे, नायब तहसीलदार वीर, खाडे, मुंडे यांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.