विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थीती
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Revenue Weekday) : तहसिलदार संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली (Tehsil Office) तहसील कार्यालयात (Revenue Weekday) महसूल सप्ताहाचा शुभारंभ पार पडला. या सप्ताहात अनेकांना अधिवास प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले तर अनेक महिलांचे लाडकी योजनेचे फॉर्म भरून दिले. या प्रसंगी तहसिलदार संतोष काकडे, गटविकास अधिकारी एल पी सुरडकर, तालुका कृषि अधिकारी सवडतकर, तालुका कृषि अधिकारी प. स. सोनुने नायब तहसीलदार वीर, खाडे , टाके, मुंढे, तथा इतर कर्मचारी यांची उपस्थिति होती.
या शिबिरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत अधिकाधिक महिलांना जास्तीत जास्त सदर योजनेचा लाभ प्राप्त व्हावा त्यासाठी महिलांकडुन फॉर्म भरुन घेण्यात आले तसेच अधिवास व इतर दाखल्यांचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर दिनांक ०२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना दिनांक ०२ ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालय चिखली येथे तहसिलदार चिखली यांचे अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत ओदयोगीक प्रशिक्षण संस्था चिखली व छत्रपती शिवाजी शाळा प्राचार्याची बैठक आयोजीत करण्यात आली होती व विद्यार्थीना बोलवण्यात आले होते. सदर प्रशिक्षण वर्गात सदर योजनेचा त्यांना अधिकाधिक लाभ प्राप्त व्हावा त्याकरीता सदर योजनेअंतर्गत नोंदणीपात्र असणाऱ्या आस्थापनांची माहिती युवकांना माहिती करुन देण्यात आली. तसेच (Tehsil Office) तहसिल कार्यालयांतर्गत आधारकार्ड अपडेट करण्याचे आयोजन करण्यात आले होते, असे तहसिलदार संतोष काकडे यांनी दै देशोन्नती शी सांगण्यात आले.