नांदेड (Nanded) :- राज्याचे उद्योग मंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे आज नांदेड दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी सकाळी त्यांनी शहरातील उद्योग भवन येथे अधिकाऱ्यांची बैठक घेवून उद्योग विभागाच्या कामाचा आढावा घेतलाय. याबैठकीला आमदार बालाजीराव कल्याणकर,आमदार बाबुराव कदम कोहळीकर, आमदार आनंदराव बोंडारकर यांच्यासह विभागातील अधिकारी, उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शासकीय जमिनीवर उद्योगीक वसाहती निर्माण करणार असल्याची माहिती
त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी (Journalists) संवाद साधून विविध कामांची व शासकीय जमिनीवर उद्योगीक वसाहती निर्माण करणार असल्याची माहिती दिली. तसेच खादी ग्राम उद्योग, विश्वक्रमा योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्माती योजना व इतर सर्व बाबींचा आढावा घेवून अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. चार जिल्ह्यात उद्योग भवनाची कामे सुरू आहेत सहा महिन्यात ते पुर्ण होणार आहेत. नांदेडला देखील एखादा मोठा उद्योग आण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्याशी चर्चा करून जे काही सकारात्मक करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री उदय सांमत यांनी सांगितले आहे.