हिंगोली न.प. प्रभाग क्र.५ ब व ११ ब मध्येही निवडणुकीचा सुधारीत कार्यक्रम जाहिर
हिंगोली (Vasmat Nagar Parishad) : वसमत नगरपालिकेची निवडणुक स्थगित करण्यात आली होती. त्यावरून आता जिल्हाधिरी राहूल गुप्ता यांनी वसमत न.प. नगराध्यक्ष व सदस्य पदाची निवडणुक सुधारीत कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.तसेच याच कार्यक्रमात हिंगोली न.प.मधील प्रभाग क्रमांक ५ ब व ११ ब याचाही समावेश आहे.
वसमत नगर परिषद (Vasmat Nagar Parishad) अध्यक्ष व सर्व १५ प्रभागाचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला. यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी विकास माने, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सय्यद रफीक कंकर यांची केली आहे. यासाठी १० डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत वसमत उपविभागीय अधिकारी कार्यालयात नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहेत. ११ डिसेंबरला निवडणुक चिन्ह तर २० डिसेंबरला सकाळी ७.३० ते ५.३० पर्यंत मतदान आणि २१ डिसेंबरला सकाळी १० वाजल्यापासून औद्योगिक संस्था परभणी रोड वसमत येथे मतमोजणी होणार आहे.
याच कार्यक्रमानुसार हिंगोली न.प. मधील प्रभाग क्र. ५ ब व ११ ब यामधील निवडणुक घेण्यात येणार आहे. यासाठी (Vasmat Nagar Parishad) निवडणुक निर्णय अधिकारी समाधान घुटूकडे व न.प.मुख्याधिकारी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अरविंद मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याठिकाणची मोतमोजणी कल्याण मंडपम् जुनी नगरपरिषद कार्यालय हिंगोली येथे करण्यात येणार आहे.




