नवी दिल्ली/ मुंबई (Rising Inflation) : संपूर्ण देशाभरात सातत्याने महागाईनत (Rising Inflation) वाढ होतांना दिसत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही झपाट्याने वाढत आहेत. गेल्या वर्षभरात खाद्यपदार्थांच्या किमती 65 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामध्ये दररोज वापरल्या जाणाऱ्या भाज्यांचा सुद्धा समावेश आहे. भाजीपाल्याचे दर वाढल्याने बहुतांश घरांच्या स्वयंपाकघरातून भाजीपाला गायब होऊ लागला आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या (Ministry of Consumer Affairs) माहितीनुसार, या पावसाळा सुरु होताच, कांदा, बटाटा आणि टोमॅटोच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. यासोबतच डाळी, तांदूळ आदी खाद्यपदार्थही महागले आहेत.
जाणून घ्या, भाज्यांचे भाव किती वाढले?
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या (Ministry of Consumer Affairs) आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी 21 जून रोजी तांदळाची किंमत 40 रुपये किलोवरून 45 रुपये प्रति किलोपर्यंत वाढली होती, तर मूग डाळीची किंमत 109 रुपयांवरून 119 रुपये झाली होती. तर मसूर डाळीचा भाव 92 रुपयांवरून 94 रुपये आणि साखरेचा दर 43 रुपयांवरून 45 रुपये किलो झाला आहे. त्याचबरोबर दुधाच्या दरात प्रतिलिटर 58 रुपयांवरून 59 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. शेंगदाणा तेलाचे दर जवळपास स्थिर राहिले असून, मोहरीच्या तेलाचा भाव 142 वरून 139 रुपये प्रतिलिटर झाली आहे. सोया तेलाचा भाव 132 वरून 124 रुपये प्रतिलिटरवर आला आहे. पामतेलाचे दर 106 रुपयांवरून 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत घसरले आहेत, तर चहाचा दर 274 रुपयांवरून 280 रुपये किलो झाला आहे.
वर्षभरात खाद्यपदार्थांच्या किमती 65 टक्क्यांनी वाढ
किरकोळ बाजारातील (Retail market) आकडेवारीनुसार, भाज्यांच्या किमतीतही झपाट्याने वाढ झाली आहे. (Rising Inflation) बाजारात गोभीचे भाव 80 रुपये किलो, (Retail market) किरकोळ बाजारात परवलचा भाव 60 रुपये किलो, तर लौकीचा भाव 60 रुपये किलोवर गेला आहे. तर बटाट्याचे भाव 22 ते 32 रुपये किलो, तर कांद्याचे दर 23 ते 38 रुपये किलो झाले आहेत. टोमॅटोचा भाव 32 रुपयांवरून 48 रुपये किलो झाला आहे, तर अरहर डाळीचा भाव 128 रुपयांवरून 161 रुपये किलो झाला आहे, तर उडीद डाळीचा भाव 112 रुपयांवरून 127 रुपये किलो झाला आहे.